सेन्सेक्‍स महिनाभराच्या नीचांकी पातळीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

मुंबई - अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाच्या वणव्यात भारतीय शेअर बाजाराची होरपळ होत आहे. दोन बड्या अर्थव्यवस्थांमधील वादामुळे जागतिक बाजारपेठेची घडी विस्कटणार असल्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. १८) बाजारात जोरदार विक्री केली.

दिवसअखेर सेन्सेक्‍स २९५ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार २९० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ९८.८५ अंशांची घट नोंदविण्यात आली आणि तो ११ हजार २७८ अंशांवर स्थिरावला.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारत आहेत. कच्च्या तेलाची महागाई देशांतर्गत तूट वाढण्यास कारणीभूत ठरणार आहे. कच्च्या तेलाचे भाव, रुपयातील अवमूल्यन, अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष यामुळे नजीकच्या काळात शेअर बाजारावरील दबाव कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यातच चलन बाजारात रुपयाने आज पुन्हा एकदा डॉलरसमोर गुडघे टेकले. रुपयाचे मूल्य ४६ पैशांच्या अवमूल्यनासह ७२.९७ पर्यंत खाली गेले, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे मनोबल खचले.

विलीनीकरणाला नापसंती 
सार्वजनिक क्षेत्रातील तीन बॅंकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाला गुंतवणूकदारांनी नापसंती दर्शविली. विलीनीकरणातील बॅंक ऑफ बडोदा आणि विजया या बॅंकांच्या शेअर्सची बाजारात जोरदार विक्री झाली. दिवसअखेर बॅंक ऑफ बडोदाचा शेअर १६ टक्के आणि विजया बॅंक ५.६९ टक्के घसरला. मात्र देना बॅंकेच्या शेअरमध्ये १९.७५ टक्‍क्‍यांची वाढ झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Decrease