सेन्सेक्‍स गडगडला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

मुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री केल्याने शेअर निर्देशांकात मोठी घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३४५ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार ८१३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १०३ अंशांची घट होऊन १० हजार ४८२ अंशांवर बंद झाला.

तेल भाववाढ आणि रुपयाच्या अवमूल्यनाने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला. वाहननिर्मिती, तेल आणि वायू, पीएसयू, बॅंकिंग समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. टाटा मोटर्स, हिरोमोटो कॉर्प, पॉवरग्रीड, मारुती सुझुकी आदी समभागांमध्ये घसरण झाली. येस बॅंक, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय, बजाज ऑटो, एशियन पेंट्‌स, कोल इंडिया, एचडीएफसी बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज आदी समभाग एक टक्‍क्‍यांपर्यंत घसरले.

रुपयात ३९ पैशांचे अवमूल्यन 
चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे आज ३९ पैशांचे अवमूल्यन झाले. दिवसभरात तो ५७ पैशांनी घसरून ७३.०७ पर्यंत खाली आला होता. त्यानंतर तो सावरला आणि ७२.८९ वर स्थिरावला. तेल भाववाढीनंतर आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाच्या मूल्यावर परिणाम झाल्याचे चलन बाजारातील विश्‍लेषकांनी सांगितले. ब्रिटिश पौंडच्या तुलनेत डॉलरचे मूल्य १८ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Decrease