अमेरिका आणि रशियामध्ये पुन्हा तणाव; शेअर बाजारात घबराट

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मुंबई: आण्विक मिसाइलच्या मुद्दावर अमेरिका आणि रशिया या दोन देशांदरम्यान सुरु झालेले धमकीसत्र आणि चीनच्या हुवाई टेक्नॉलॉजीसच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्याला कॅनडाच्या सरकारने अटक केल्यानंतर या अधिकाऱ्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज आशियाई शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण सुरु झाली आहे. चीनचा प्रमुख निर्देशांक शांघाय कॉम्पोझिट इंडेक्स, हॉंगकाँगचा हॅंग सेंग इंडेक्स आणि जपानचा निक्केई याचबरोबर सिंगापूर, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया सारख्या देशांच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

मुंबई: आण्विक मिसाइलच्या मुद्दावर अमेरिका आणि रशिया या दोन देशांदरम्यान सुरु झालेले धमकीसत्र आणि चीनच्या हुवाई टेक्नॉलॉजीसच्या मुख्य आर्थिक अधिकाऱ्याला कॅनडाच्या सरकारने अटक केल्यानंतर या अधिकाऱ्याचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज आशियाई शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण सुरु झाली आहे. चीनचा प्रमुख निर्देशांक शांघाय कॉम्पोझिट इंडेक्स, हॉंगकाँगचा हॅंग सेंग इंडेक्स आणि जपानचा निक्केई याचबरोबर सिंगापूर, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया सारख्या देशांच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्याचा फटका भारतीय शेअर बाजाराला देखील बसताना दिसत आहे. त्यातच देशांतर्गत निवडणुकांचे निकाल जवळ येत असल्याने गुंतवणूकदारांनी आपले पेइसे काढून घ्याल सुरुवात केली आहे. 

सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 400 अंशांनी घसरून 35,500 च्या खाली घसरला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने देखील 130 अंशाची घसरण नोंदविली आहे. त्याचबरोबर 10,700 चा महत्वपूर्ण टप्पा तोडून निफ्टी 10,650 च्या जवळपास व्यवहार करत आहे. 

स्मालकॅप मिडकॅप आणि लार्जकॅप मधील जवळपास सर्वच शेअर्स नकारात्मक व्यवहार करत आहेत. 

रुपया देखील घसरला 

आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रुपया मजबूत होत असताना आणि आरबीआयने पतधोरण कायम ठेवल्यानंतर रुपया देखील मोठ्या प्रमाणात घसरला आहे. बुधवारी 70.57 वर बंद झालेला रुपया आज 50 पैशानी घसरून 71 रुपयांच्यावर व्यवहार करत आहे. 

Web Title: Sensex extends losses, down 400 points