आणखी एक दिवस 'घसरणी'चा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई: शेअर बाजारात आज (गुरुवार) दिवसभर मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरु होते. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 129.91 अंशांच्या घसरणीसह 33 हजार 006.27  अंशावर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 10 हजार 114.75 अंशावर स्थिरावला. त्यात  40.5 अंशाची घसरण झाली. सकाळच्या सत्रात शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. निफ्टीने 10,200 अंशाची महत्त्वपूर्ण पातळी गाठली तर सेन्सेक्समध्ये 150  अंशाची तेजी दिसून आली. 

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज विक्रीचा मारा सुरु होता. त्यापाठोपाठ बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, रिअल्टी, कॅपिटल गुड्स, पॉवर व ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने निर्देशांकात घसरण झाली. बँक निफ्टी 0.5 टक्क्याच्या घसरणीसहा 24 हजार 141.5 पातळीवर बंद झाला. तर निफ्टीमध्ये पीएसयू बँक निर्देशांक 2 टक्के, ऑटो निर्देशांक 0.9 टक्के आणि आयटी निर्देशांक 1 टक्क्याच्या घसरणीसह बंद झाला.  मात्र, आज मेटल कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. 

आज मुंबई शेअर बाजारात बीपीसीएल, एचपीसीएल, एसबीआय, विप्रो, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी यांचे शेअर्स प्रत्येकी 3.7 ते 2 टक्के घसरणीसह बंद झाले. तर वेदांत, ओएनजीसी, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स डीव्हीआरमध्ये 2.5 ते 0.7 टक्क्याची वाढ नोंदवण्यात आली. 
 
Web Title: Sensex falls 130 points