esakal | 'भेकड आणि संघ विचारसरणीच्या लोकांनी काँग्रेसपासून लांब रहावं'
sakal

बोलून बातमी शोधा

'भेकड आणि संघ विचारसरणीच्या लोकांनी काँग्रेसपासून लांब रहावं'

'भेकड आणि संघ विचारसरणीच्या लोकांनी काँग्रेसपासून लांब रहावं'

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी सरकारच्या ध्येयधोरणांवर कठोर टीका करताना दिसून येतात. ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत असतात. मोदी सरकारच्या चुका आणि जे व्हायला हवं, त्याविषयी ते सातत्याने मते मांडत असतात. भाजप आणि पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर राहुल गांधी यांनी सातत्याने टीका केली आहे. संघाची विचारधारा देशाला अहितकारक असल्याचं मत राहुल गांधी आणि सतत मांडलं आहे.

हेही वाचा: मोठी कारवाई! अनिल देशमुखांची 4 कोटी 20 लाखांची संपत्ती ED कडून जप्त

हेही वाचा: भारतासोबतच्या विसंवादाबाबत इम्रान खान म्हणतात; RSS ची विचारधारा...

यासंदर्भातच एक महत्त्वाचं विधान आज राहुल गांधी यांनी केलं आहे. एकप्रकारे त्यांनी पक्षाची कठोर भुमिकाच मांडली आहे. त्यांनी स्पष्टपणे पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलंय की आम्हाला RSS च्या विचारधारेचे लोक नको आहेत. RSS चे हितचिंतक आणि त्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी काँग्रेसपासून लांबच रहावं, असं त्यांनी म्हटंलय. तसेच त्यांनी निर्भय लोकांसाठी काँग्रेसची दारे उघडी असल्याचं देखील म्हटलंय.

राहुल गांधी म्हणाले की, निडर असे अनेक लोक आहेत, जे सध्या काँग्रेसमध्ये नाहीयेत. अशा लोकांना काँग्रेसमध्ये आणलं पाहिजे आणि जे काँग्रेसवाले भाजपला घाबरतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. जे RSS च्या विचारधारेवर विश्वास ठेवतात, अशांची आम्हाला गरज नाहीये. आम्हाला निर्भय लोक हवे आहेत, असं मत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडलंय. ते पक्षाच्या सोशल मीडिया बैठकीमध्ये बोलत होते.

loading image