Stock Market Update : सेन्सेक्स-निफ्टीची दमदार ओपनिंग

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 11 December 2020

ओएनजीसी शिवाय एसबीआय, एनटीपीसी, बजाज फायनान्स, टाटा स्टील, बजाज फिनसर्व, एचडीएफसी आणि रिलायंन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले. दुसरीकडे  एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि नेस्ले इंडियाच्या शेअरचे भाव पडल्याचे चित्र दिसले.  

Stock Market शेअर बाजार पुन्हा एकदा पटरीवर आला आहे. शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजधील सेन्सेक्स (BSE) 46,060 ने खुला झाला. 100 अंशाच्या उसळीने सुरुवातीच्या सत्रात BSE मधील सेन्सेक्स 46,110.11 वर पोहचल्याचे पाहायला मिळाले. हा  आलेख चढत्या क्रमाने व्यवहार करत होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीच्या निर्देशांकात 0.54 टक्क्यांची  वाढ दिसून आली. 

ओएनजीसी शिवाय एसबीआय, एनटीपीसी, बजाज फायनान्स, टाटा स्टील, बजाज फिनसर्व, एचडीएफसी आणि रिलायंन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले. दुसरीकडे  एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि नेस्ले इंडियाच्या शेअरचे भाव पडल्याचे चित्र दिसले.  

भारतीय अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारणा; ‘एडीबी’चा अहवाल

मागील चार दिवसांपासून शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. गुरुवारी त्याला ब्रेक लागला होता. काल  सन्सेक्समध्ये 144 अंशांनी घट झाली होती. तर निफ्टी 50 अंशांनी घसरला होता.  बीएसईचा 30 कंपनींच्या शेयर्सचा सूचकांक सेंसेक्स 143.62 अंशांनी म्हणजे 0.31 टक्के घसरणीसह बंद झाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 50.80 अंश म्हणजेच 0.38 टक्के घटीसह  13,478.30 वर बंद झाला होता. 

शेअर बाजारातील रेकॉर्ड 

कोरोनाच्या महामारीत मार्च महिन्यात कोसळलेल्या शेअर बाजारात ऑक्टोबरमध्ये तेजीचे वातावरण अनुभवायला मिळाले. सेन्सेक्ससने 40 हजारचा टप्पा पार केला. 5 नोव्हेंबरला सेन्सेक्स   41,340 वर बंद झाला.10 नोव्हेंबरमध्ये यात आणखी सुधारणा झाली. या दिवशी सेन्सेक्स 43,227 वर पोहचला. 18 नोव्हेंबर 44180 आणि 4  डिसेंबर 45000, 9 डिसेंबरला पहिल्यांदात  सेन्सेक्सनं  46000 वर पोहचून 46103.50 वर बंद झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex gains 195 points in opening trade currently at 46 155  Nifty opens at 13 544