शेअर बाजारात उत्साह; बाजार नव्या अर्थमंत्र्याच्या प्रतीक्षेत 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मे 2019

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा सलग दुसरा शपथविधी पार पडल्यानंतर शेअर बाजाराने पुन्हा एकदा सलामी दिली आहे. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पुन्हा एकदा अनुक्रमे 40 हजार 122 आणि 12 हजार 039 अंशांची पातळी ओलांडली आहे. मोदी सरकारला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शेअर बाजाराने नवीन उच्चांक गाठले होते. 

आता नवी दिल्लीतील मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यानंतर कोणते मंत्रिपद कोणाला मिळते याकडे बाजारचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्रीपद कोणाला मिळते याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. अमित शाह आणि पियुष गोयल यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या 240.35 अंशांनी वधारला असून  40  हजार 072 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टीमध्ये 74.25 अंशाची वाढ झाली आहे. तो 12 हजार 020.15 अंशांवर आहे. या दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 11 पैशांनी वधारले आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, आयओसी, ब्रिटानिया यांचे शेअर प्रत्येकी 3.66 ते 2.69 टक्क्यांदरम्यान वधारले आहे. तर ग्रासिम, येस बँक, टाटा मोटर्स आणि झीच्या शेअरमध्ये 2.91 ते एक टक्क्यादरम्यान घसरण झाली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex gains 200 pts, Nifty above 12,000