सेन्सेक्स 100 अंशांनी तेजीत; निफ्टी 8900 अंशांच्या पार

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आज(बुधवार) तेजीत सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे 100 अंशांची वाढ झाली असून निफ्टीची 8900 अंशांच्या पार सुरुवात झाली आहे. सध्या(9 वाजून 53 मिनिटे) सेन्सेक्स 28,829.18 पातळीवर व्यवहार करत असून 67.59 अंशांनी वधारला आहे. निफ्टी 8923 अंशांच्या पातळीवर व्यवहार करत असून 15.65 अंशांनी वधारला आहे.

बँकिंग क्षेत्रातील तेजीने बाजाराच्या एकुण वाढीस हातभार लावला आहे. याशिवाय, पीएसयू आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रातदेखील सकारात्मक व्यवहार सुरु आहे. याऊलट, ऑटो, कॅपिटल गूड्स, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि आयटी क्षेत्रात दबावासह व्यवहार सुरु आहे.

निफ्टीवर रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, भारती इन्फ्राटेल, एशियन पेंट्स आणि टाटा मोटर्स(डीव्हीआर) चे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, आयसीआयसीआय बँक आणि सन फार्माचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: sensex india up today