शेअर बाजाराकडून निवडणूक निकालाचे स्वागत 

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाच्या या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात ६५० अंशांपेक्षा जास्त घसरलेला शेअर बाजार सावरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर व्यवहार करत आहेत. सेन्सेक्स 181.26 अंशांनी वधारला असून तो 35 हजार 140.98 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 50.60 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी सध्या 10 हजार 539 पातळीवर आहे. 

काँग्रेस तीन राज्यांमध्ये पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हे दिसत असल्याने शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी स्वागत केल्याचे दिसते आहे. सध्या मुंबई शेअर बाजारात 
येस बँक, एशियन पेंट्स, सनफार्मा, ऍक्सिस बँक, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ बँकांचे शेअर देखील सकारात्मक पातळीवर व्यवहार करत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex, Nifty Recover Losses