esakal | शेअर बाजारात घसरणीला ब्रेक ; सेन्सेक्स, निफ्टीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर बाजारात घसरणीला ब्रेक ; सेन्सेक्स, निफ्टीत वाढ

भारतीय शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करून बंद झाला. परिणामी सेन्सेक्स 637 अंशांनी वधारून 32,009 वर बंद झाला.  तर निफ्टी 187 अंशांनी वाढून 9,383.55 वर स्थिरावला. 

शेअर बाजारात घसरणीला ब्रेक ; सेन्सेक्स, निफ्टीत वाढ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारून बुधवारी भारतीय शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करून बंद झाला. परिणामी सेन्सेक्स 637 अंशांनी वधारून 32,009 वर बंद झाला. तर निफ्टी 187 अंशांनी वाढून 9,383.55 वर स्थिरावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेने बीएसई आणि एनएसईवरील बहुतेक सर्वच निर्देशांक सकारात्मक व्यवहार करून बंद झाले. क्षेत्रनिहाय पातळीवर फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक वगळता सर्वच निर्देशांक मोठ्या प्रमाणात वधारले होते. त्यापैकी बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, रिएल्टी आणि ऑटो क्षेत्राचे निर्देशांक सर्वाधिक वधारले होते.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

* सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर बाजारात तेजी
* सेन्सेक्सची 637 अंशांनी उसळी
* निफ्टी 187 अंशांनी वधारला
* रुपया किंचित वाढ

सेन्सेक्सच्या मंचावर 30 पैकी 26 शेअर तेजी करून बंद झाले. यापैकी अॅक्सीस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एल अँड टी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर सर्वाधिक वधारले होते. तर, नेस्ले, सनफार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एअरटेलच्या शेअरमध्ये घसरण झाली होती.  

मोठी बातमी : लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला ३ लाख कोटींचे पॅकेज; मिळणार विनातारण कर्ज

रुपया किंचित वाढ

आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपया 5 पैशांनी वधारून डॉलरच्या तुलनेत 75.46 वर बंद झाला.