सेन्सेक्समध्ये 200 अंशांनी वधारला; निफ्टी 8950 अंशांवर

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई: जागतिक बाजारात संमिश्र वातावरण असूनदेखील आज(सोमवार) भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीसह व्यवहार सुरु आहे. आठवड्यातील पहिल्या दिवशी सेन्सेक्समध्ये सुमारे 200 अंशांपर्यंत वाढ झाली असून दरम्यान निफ्टीने 8,950 अंशांच्या पातळीला स्पर्श केला.

सध्या(10 वाजून 15 मिनिटे) सेन्सेक्स 181.44 अंशांच्या वाढीसह 29,013.89 पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी 8,952.80 अंशांवर व्यवहार करत असून 55.25 अंशांनी वधारला आहे.

बाजारात कन्झ्युमर ड्युरेबल्स, आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांवर दबाव निर्माण झाला आहे. परंतु, इतर क्षेत्रांमध्ये तेजीसह व्यवहार सुरु आहे. विशेषतः बँकिंग, मेटल आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रात एक टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे.

निफ्टीवर रिलायन्स, आयशर मोटर्स, एचसीएल टेक, एसबीआय आणि कोल इंडियाचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर ग्रासिम, अरबिंदो फार्मा, आयडिया सेल्युलर, झी एन्टरटेनमेंट आणि सन फार्माच शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: sensex up now 200 points