सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ; निफ्टी 9100 अंशांच्या पार

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा पाठपुरावा करीत आज(मंगळवार) भारतीय शेअर बाजाराची किरकोळ तेजीसह सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 40 अंशांनी वधारला होता, तर निफ्टीने 9100 अंशांच्या पार आपले स्थान कायम राखले आहे.

सध्या(10 वाजून 8 मिनिटे) सेन्सेक्स 13.53 अंशांच्या वाढीसह 29,532.27 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 9,134.30 पातळीवर व्यवहार करत असून 7.45 अंशांनी वधारला आहे. बाजारात बँकिंग, ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि मेटल क्षेत्रात घसरण झाली आहे. इतर सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक व्यवहार सुरु आहे.

निफ्टीवर लार्सेन अँड टुब्रो, अंबुजा सिमेंट्स, भारती इन्फ्राटेल, आयटीसी आणि बॉशचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर आयडिया सेल्युलर, डॉ. रेड्डीज् लॅब्स, अॅक्सिस बँक, सन फार्मा आणि अरबिंदो फार्माचे शेअर्स सर्वाधिक कोसळले होते.

Web Title: sensex up now