सेन्सेक्समध्ये १,१०० अंशांची आणि निफ्टीमध्ये ३०० अंशांची उसळी

पीटीआय
Monday, 1 June 2020

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने तेजी दाखवली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात चांगली तेजी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३२७ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,१०० अंशांची उसळी सकाळच्या सत्रात दिसून आली.

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने तेजी दाखवली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात चांगली तेजी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३२७ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,१०० अंशांची उसळी सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३३,५८० अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,९०० अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सर्वच सेक्टोरेल निर्देशांकात तेजी नोंदवण्यात आली आहे. बजाज फायनान्स, टायटन, महिंद्रा अॅंड महिंद्रा, टाटा स्टीलसारख्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. बॅंक निफ्टीदेखील चांगलीच तेजी नोंदवणम्यात आली आहे.

रिटर्न ऑन कॅपिटल उत्तम परतावा मिळण्याचा मूळ मंत्र

सरकारने हळूहळू लॉकडाऊन उठवत  कामकाज सुरू करण्यास सुरूवात केल्याने आणि मॉन्सूनच्या वेळेवर होणाऱ्या आगमनाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला आहे.  

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही तेजी नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २६८० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

गुंतवणुकीची संधी: 'भारत बॉण्ड ईटीएफ'

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र थोडी घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 0.0८ रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात  डॉलरच्या तुलनेत रुपया 75.५३ रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

* सेन्सेक्स ३३,५८० अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,९०९ अंशांच्या पातळीच्या वर 
* निफ्टीमध्ये ३२७ अंशांची उसळी
* सेन्सेक्समध्ये १,१०० अंशांची उसळी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex raises by 1100 points