अखेर शेअर बाजार 'हसला' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

सततच्या घसरणींनंतर अखेर आज (मंगळवार) शेअर बाजार सकारात्मक पातळीवर व्यवहार करतो आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 152.98 अंशांनी वधारला असून 33 हजार 076 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 53.35 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी  10152.98 पातळीवर आहे.

मुंबई: सततच्या घसरणींनंतर अखेर आज (मंगळवार) शेअर बाजार सकारात्मक पातळीवर व्यवहार करतो आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 152.98 अंशांनी वधारला असून 33 हजार 076 पातळीवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 53.35 अंशांची वाढ झाली आहे. निफ्टी  10152.98 पातळीवर आहे. 

शेअर बाजारात क्षेत्रीय पातळीवर आयटी आणि एनर्जी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने निर्देशांकांना बळ मिळाले आहे. मात्र फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुरु असलेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे निर्देशांक खालच्या दिशेने (डाउन साईड) सरकतो आहे. 

सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात टेक महिंद्रा, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारती इन्फ्राटेल आणि टाटा स्टील यांचे शेअर्स प्रत्येकी 1.7 टक्के व 4 टक्क्यांनी वधारले आहे. त्यापाठोपाठ विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये किरकोळ वाढ झाली आहे. मात्र फार्मा क्षेत्रात सिप्ला आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 
 

Web Title: Sensex Rises 100 Points, Nifty Above 10,100