सेन्सेक्‍स ३७ हजार अंशांसमीप

पीटीआय
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई - मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात वाढ झाली. सेन्सेक्‍स आज ३३ अंशांनी वधारून ३६ हजार ८५८ अंश या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर बंद झाला. निर्देशांकांची ऐतिहासिक वाटचाल कायम असून, दिवसभरात त्याने ३६ हजार ९४७ अंशांपर्यंत मजल मारली होती. लवकरच तो ३७ हजार अंशांचे शिखर सर करेल, असा अंदाज विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे. 

सेन्सेक्‍सची घोडदौड सुरू असताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत मात्र २ अंशांची किरकोळ घट होऊन तो ११ हजार १३२ अंशांवर बंद झाला. आजच्या सत्रात धातू, ऊर्जा आणि बॅंकिंग क्षेत्रातील समभागांना मागणी दिसून आली. चलन बाजारात सावरलेला रुपया, कंपन्यांच्या चांगल्या तिमाही निकालांनी खरेदीस पोषक वातावरण निर्माण झाले. सकाळपासून शेअर बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला. वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर काही समभागांमध्ये नफावसुली दिसून आली. अखेर सेन्सेक्‍स ३३ अंशांच्या वाढीसह ३६ हजार ८५८ अंशांवर बंद झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sensex stop