सेन्सेक्‍सची आपटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेची व्याजदरवाढ आणि चीन-अमेरिका व्यापार युद्धाचे पडसाद गुरुवारी (ता. २) शेअर बाजारात उमटले. जागतिक अनिश्‍चिततेने भयभीत झालेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीला प्राधान्य देत नफा वसुली केली. ज्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्‍स ३५६.४६ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार १६५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १०१.५० अंशांची घट झाली आणि तो ११ हजार २४४ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. 

शेअर बाजाराच्या माहितीनुसार परकी गुंतवणूकदारांनी बुधवारी ९५.९४ कोटींचे शेअर्स विक्री केले. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनीदेखील ५६२.३३ कोटींची विक्री केली. आजच्या विक्रीत ऑटो, बॅंकिंग आणि रियल्टी आदी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली.मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर एअरटेल, कोटक बॅंक, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, आदी शेअर घसरणीसह बंद झाले. पॉवरग्रीड, कोल इंडिया, एचयूएल, इंड्‌सइंड आदी शेअर तेजीसह बंद झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sensex stop