सेन्सेक्सने गाठला 39 हजारांचा टप्पा 

सेन्सेक्सने गाठला 39 हजारांचा टप्पा 

मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती. सेन्सेक्सने 39 हजारांची पातळी ओलांडली असून ती आता 1167.61 अंशांनी वधारून 39 हजार 098 अंशांवर व्यवहार करतो आहे. 

सध्या सेन्सेक्स1167.61 अंशांनी वधारला असून तो 39 हजार 098 अंशांव व्यवहार करतो आहे. तर निफ्टी सध्या 343.35 अंशांनीं वधारला असून तो 11 हजार 750.50 अंशांवर आहे. 

शेअर बाजाराने जोरदार उसळी मारल्यानंतर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपया देखील 73 पैशांनी वधारला आहे. रविवारी लोकसभा निवडणूक मतदानाचा अखेरचा सातवा टप्पा पार पडला. त्यानंतर विविध माध्यमांनी एक्झिट पोल जाहीर केले असून केंद्रात पुन्हा मोदी सरकार सत्तेत येत असल्याचे दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेअर बाजारात देखील उत्साह संचारला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com