रुपया सावरला; सेन्सेक्‍सची त्रिशतकी भरपाई

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

मुंबई - रुपयाला सावरण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यानंतर गुंतवणूकदारांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी केलेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्‍स आणि निफ्टीत वाढ झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३०५ अंशांच्या वाढीसह ३७ हजार ७१७ अंशांवर बंद झाला. निफ्टीने ८२.४० अंशांची वाढ नोंदवत ११ हजार ३६९ अंशांपर्यंत कूच केली. गणेश चतुर्थीनिमित्त उद्या (ता. १३) शेअर बाजार बंद राहणार आहे.

आजच्या सत्रात एफएमसीजी, मेटल, कॅपिटल गुड्‌स आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. चलन बाजारात रुपयाने यू-टर्न घेतला. डॉलरच्या तुलनते तो ५१ पैशांनी वधारला. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा भाव कमी झाला आहे. ऑगस्टमधील निर्यातीची उत्साहवर्धक आकडेवारी आणि चलनवाढ कमी झाल्याने गुंतवणूकदारांना आनंद द्विगुणित झाला. त्यांनी खरेदीचा होरा कायम ठेवला. आशियातील बाजारांमध्ये मात्र घसरण नोंदवण्यात आली.  

रुपया मजबूत 
चलन बाजारात रुपयाच्या विक्रमी अवमूल्यनाने आज अखेर केंद्र सरकारला खडबडून जाग आली. रिझर्व्ह बॅंकेकडून चलन बाजारात हस्तक्षेप करण्यात आल्याचा अंदाज विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे. यामुळे रुपयाचे मूल्य वधारले. सकाळच्या सत्रात ७२.९१ च्या नीचांकी पातळीला गेलेला रुपया १०० पैशांनी सावरून ७१.९२ पर्यंत वधारला होता. दिवसअखेर रुपया डॉलरच्या तुलनेत ५१ पैशांनी वधारून ७२.१८ वर बंद झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex tanks 332 points