शेअर बाजारात घसरण सुरूच 

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

मुंबई: (मार्केट अपडेट) शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये सध्या 180.98 अंशांची घसरण झाली असून तो 32 हजार 995 अंशांवर व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निदेशांक निफ्टी 10 हजार 125 अंशांवर व्यवहार करतो आहे. त्यात 70 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टीने आज (सोमवार) दिवसभरात  10 हजार 094 अंशांची नीचांकी पातळी गाठली आहे. 

शेअर बाजारातील तज्ञांच्यामते, देशांतर्गत बाजारात राजकीय अनिश्चिततेमुळे आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात पॉवरग्रीड, सिप्ला, एनटीपीसी, मारुती आणि एलटी यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर टाटा स्टील, आयओसी, बीपीसीएल, टेक महिंद्रा आणि हिंडाल्को यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली आहे. 

Web Title: Sensex under pressure, Nifty breaks 10,100 Levels