विक्रमी उंचीवर शेअर मार्केट! 958 अंकांच्या तेजीसह 60,000 चा टप्पा नजीक

Share Market
Share MarketSakal

मुंबई: आज आठवड्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी शेअर बाजारातील दिवसभरातील उतार-चढानंतर बाजार एका मोठ्या उंचीवर बंद झालेला पहायला मिळाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 958.03 अंकांनी म्हणजेच तब्बल 1.63 टक्के वाढीसह 59,885.36 वर थांबलेला पहायला मिळाल. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 276.30 अंकांनी म्हणजेच 1.57 टक्क्यांनी 17,822.95 वर थांबलेला पहायला मिळाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 710 अंक म्हणजेच 1.21 टक्क्यांनी तेजीत होता. आज मार्केटमध्ये सेन्सेक्स 17,822.95 आणि निफ्टी 17,843.90 च्या स्तरावर गेलेला पहायला मिळाला.

Share Market
अमेरिकेतील भारतीय उद्योजकाने केले 500 कर्मचारी 'करोडपती'

तेजीचं 'हे' आहे कारण

आयपीओचे मार्केट देखील आज चांगलं चाललेलं पहायला मिळालं. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपन्यांना चांगले रिटर्न्स मिळण्याची आशा आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दोन लाटांना तोंड दिलेली अर्थव्यवस्था आता रुळावर येण्याच्या अपेक्षेत आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपी विकास दर 20.1 टक्के राहिला आहे. लसीकरणामुळे कोरोनाची भीती नष्ट होत असून गुंतवणूकदारांनी आपले हात मोकळे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच ही तेजी दिसून येत असल्याचं म्हटलं जातंय.

मोठ्या शेअर्सची ही होती आज परिस्थिती

आज दिवसभर हिंडाल्को, बजाज फिनसर्व, एल अँड टी, कोल इंडिया आणि टाटा मोटर्स हे शेअर्स हिरव्या रंगानी तेजीत होते. तर एचडीएफसी लाइफ, डॉक्टर रेड्डी, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा कंज्यूमर आणि आयटीसी शेअर्स लाल निशाण्यावर दिसून आले.

मार्केटची सुरुवात तेजीत

आज मार्केट तेजीमध्ये उघडल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स 351.37 अंक अथवा 0.60 टक्क्यांच्या तेजीसह 59,278.70 स्तरावर उघडला होता. तर निफ्टी 115.10 अंकांनी 0.66 टक्क्यांच्या वाढीसह 17,661.80 च्या स्तरावर उघडला होता. यानंतर दिवसभर बाजारात तेजी कायम राहिल्याचं दिसून आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com