कार्डद्वारे दोन हजारापर्यंतची खरेदी सेवाकरमुक्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने महत्वाचा निर्णय घेतला असून डेबिट अथवा क्रेडिट कार्डच्या सहाय्याने केलेल्या दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर यापुढे सेवा कर आकारण्यात येणार नसल्याचे रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केले आहे.

नवी दिल्ली: ऑनलाइन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने महत्वाचा निर्णय घेतला असून डेबिट अथवा क्रेडिट कार्डच्या सहाय्याने केलेल्या दोन हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर यापुढे सेवा कर आकारण्यात येणार नसल्याचे रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केले आहे.

कार्डच्या साह्याने व्यवहार केल्यास त्यावर दोन टक्के सेवा आकारण्यात येतो. त्यामुळे ग्राहकांना वस्तूच्या किंमतीपेक्षा अधिक पैसे द्यावे लागतात. त्यामुळे ग्राहक रोखीने व्यवहार करण्याला पसंती देतात. आता ग्राहक जेवढ्या रकमेच्या वस्तू विकत घेईल, तेवढीच रक्कम ग्राहकांना द्यावी लागेल. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीत. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार असून ऑनलाइन व्यवहारांना अधिक चालना मिळेल.

त्याचप्रमाणे दोन हजार रुपयांपर्यंतच्या ऑनलाइन व्यवहारांसाठी आता वन टाइम पासवर्डची (ओटीपी) आवश्‍यकता देखील भासणार नाही. ऑनलाइन व्यवहारावेळी पेमेंट करण्याआधी ओटीपी विचारला जातो. या पासवर्डची पूर्तता केल्यानंतरच संपूर्ण व्यवहार पूर्णत्वास जातो. हा ओटीपी एसएमएसच्या माध्यमातून पाठवला जातो. याआधी ऑनलाइन व्यवहार या ओटीपीशिवाय पूर्णत्वास जात नव्हते. मात्र आता दोन हजार रुपयांखालील व्यवहारांसाठी ओटीपीची आवश्‍यकता नसेल. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार अधिक जलदपणे पूर्ण होतील. ऑनलाइन पेमेंटची सुविधा देणाऱ्या कंपन्यांकडून कमी किमतीच्या व्यवहारांसाठी ओटीपी नसावा, अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून केली जात होती.

Web Title: Service tax relief from two thousand card payment