शक्तिकांता दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर 

शक्तिकांता दास रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर 

मुंबई: शक्तिकांता दास यांची रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आली आहे. उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यांनतर सरकारने दास गव्हर्नर निवड केली आहे. मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची येत्या शुक्रवारी महत्त्वाची बैठक असल्याने नवीन गव्हर्नरची नियुक्ती करणे आवश्यक होते. 

दास यांनी 2015 ते 2017 या काळात केंद्रीय अर्थ सचिव म्हणून काम बघितले होते. ते भारताच्या वित्त आयोगाचे सदस्य देखील आहेत. शिवाय जी-20 शिखर परिषदेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून देखील काम बघतात. 

 पटेल यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र गेल्याकाही दिवसांपासून स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण झाला होता. उर्जित पटेल हे गव्हर्नरपदाचा राजीनामा देणार याची चर्चा आधीपासूनच सुरु होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com