Share Market | 37 पैशांचा शेअर पोहोचला 300 रुपयांवर, केवळ 12 हजारांत गुंतवणुकदार कोट्यधीश... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : 37 पैशांचा शेअर पोहोचला 300 रुपयांवर, केवळ 12 हजारांत गुंतवणुकदार कोट्यधीश...

मुंबई : आयटी कंपन्यांमध्ये सध्या मंदीचे वातावरण असून शेअर्सवर दबाव आहे. तरी काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. अशीच एक कंपनी बिर्लासॉफ्ट (BirlaSoft) आहे. सध्या बिर्लासॉफ्टच्या शेअर्समध्ये 47 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

पण लाँग टर्ममध्ये हा शेअर मल्टीबॅगर सिद्ध झाला आहे आणि गुंतवणूकदारांना केवळ 12 हजारांच्या गुंतवणुकीने कोट्यधीश बनवले आहे. सध्या त्याचे शेअर्स 299.75 रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीची मार्केट कॅप 8,191.59 कोटी रुपये आहे. हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

हेही वाचा: Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

बिर्लासॉफ्टचे शेअर्स 2 सप्टेंबर 2001 रोजी केवळ 37 पैशांना मिळत होते. पण हेच शेअर्स आता 299.75 रुपयांवर पोहोचले आहेत. अर्थात सुमारे 810 पटीने हे शेअर्स वाढले आहेत. म्हणजे 21 वर्षांपूर्वी त्यात फक्त 12 हजार रुपये गुंतवून 1 कोटी रुपये तयार झाले असते.

बिर्लासॉफ्टच्या शेअर्सवर यावर्षी प्रचंड दबाव दिसून आला पण आता रिकव्हरी दिसून येत आहे. 10 जानेवारी 2022 रोजी तो 585.85 या विक्रमी उच्चांकावर होता. यानंतर, 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत ते 56 टक्क्यांनी घसरून 262.30 रुपयांवर आले. आता यात रिकव्हरी दिसून येते आहे आणि आतापर्यंत 14 टक्के वसुली झाली आहे. पण तरी विक्रमी उच्च किंमतीपासून तो 49 टक्के सवलतीवर आहे.

हेही वाचा: Best Share : मागच्या वर्षी लिस्ट झालेल्या 'या' शेअरमध्ये १३ पट वाढ, आणखी तगडा परतावा देण्याची शक्यता

बिर्लासॉफ्ट ही सीके बिर्ला ग्रुपची कंपनी आहे. जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये तिमाही आधारावर तिचा निव्वळ नफा कमी झाला आहे, पण महसुलात वाढ झाली आहे. जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये तिमाही आधारावर त्याचा निव्वळ नफा 77.01 कोटी रुपयांवरून 50.06 कोटी रुपयांवर घसरला, तर महसूल 563.44 कोटीवरुन 612.39 कोटीवर पोहोचला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share MarketStock Market