Best Share : मागच्या वर्षी लिस्ट झालेल्या 'या' शेअरमध्ये १३ पट वाढ, आणखी तगडा परतावा देण्याची शक्यता

गुंतवणूकदारांच्या भांडवलात सुमारे 13 पट वाढ झाली आहे.
Share Market Latest Updates
Share Market Latest UpdatesSakal media

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आणि आयपीओ आहेत ज्याच्या लिंस्टींगवर फार काही चर्चा होत नाही. पण याच कंपन्या अगदी शॉर्ट टर्ममध्ये आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. असाच एक आयपीओ मागच्या वर्षी आला होता तो म्हणजे एनकिंग इंटरनॅशनल एनर्जी सर्व्हिसेसचा (EKI Energy Services) होता.

ज्यांचे शेअर्स 7 एप्रिल 2021 रोजी बीएसई एसएमईवर लिस्ट झाले होते. या वर्षी त्याच्या शेअर्स विक्रीचा दबाव आहेत पण तरीही आपीओ गुंतवणूकदारांच्या भांडवलात सुमारे 13 पट वाढ झाली आहे. सध्या त्याचे शेअर्स 1399 रुपयांवर ट्रे़ड करत आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 3,850.08 कोटी आहे. (Share Market last year listed this share have best return )

एनकिंग इंटरनॅशनल एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स गेल्या वर्षी 102 रुपयांना जारी करण्यात आले होते. आता त्याची किंमत 1399 रुपये आहे. याचा अर्थ आयपीओ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1272 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या वर्षी जानेवारीमध्ये, 24 जानेवारी 2022 रोजी त्याचे शेअर्स 3149.99 रुपये असताना 2988 टक्क्यांनी वाढले होते. सध्या, EKI एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स सुमारे 56 टक्के सूटवर आहेत. गेल्या वर्षी 7 एप्रिल 2021 रोजी त्याचे शेअर्स लिस्टिंगच्या दिवशी 147 रुपयांवर बंद झाले होते.

Share Market Latest Updates
Share Market Tips: नवीन वर्षात 'हे' 5 शेअर्स करतील तुम्हाला मालामाल

ही कंपनी 2011 मध्ये स्थापन झाली. क्लायमेट चेंज, कार्बन क्रेडिट आणि सस्टेनेबिलिटी सोल्युशन्स विभागातील एक प्रसिद्ध कंपनी आहे. यापूर्वी ते कार्बन क्रेडिट प्रोजेक्ट्सचे रजिस्ट्रेशन, व्हॅलिडेशन, मॉनिटरिंग, व्हेरिफिकेशन, विमा आणि ट्रेडिंगसाठी कंसल्टंसी सेवा पुरवते.

ही कंपनी आता कार्बन क्रेडिट ट्रेडिंग, बिझनेस एक्सलेन्स एडव्हायजरी सर्व्हिसेज अँड ट्रेनिंग सर्व्हिसेज आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटशी संबंधित सेवाही प्रदान करते.

Share Market Latest Updates
Stock Split : 'या' केमिकल कंपनीने 3 वर्षात 1 लाखाचे केले 15 लाख

कंपनीचे वेस्ट मॅनेजमेंट, वीज निर्मिती, क्लीन डेव्हलपमेंट मॅकेनिझम, विमानतळ, यासह इतर विभागांमध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्रातील क्लायंट्स आहेत. तर जागतिक बँक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, केरळ राज्य विद्युत मंडळ, एनटीपीसी, गेल, एनएचपीसी आणि रेल्वे इत्यादींना सेवा प्रदान करते. त्याचे ग्राहक भारतासह अनेक देशांमध्ये आहेत.

Share Market Latest Updates
Share Market: Sensex 1056 अंकानी कोसळला; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com