
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?
Share Market: विकली एक्स्पायरीच्या दिवशी अर्थात गुरुवारी भारतीय शेअर बाजार मजबूत वाढीसह बंद झाला. गुरुवारी, सेन्सेक्स आणि निफ्टी चांगल्या रिकव्हरीसह हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स 427.79 अंकांनी म्हणजेच 0.78 टक्क्यांनी वाढला आणि हा निर्देशांक 55,320.28 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय निफ्टी 50 निर्देशांक 121 अंकांनी म्हणजेच 0.74 टक्क्यांनी वाढला आणि हा निर्देशांक 16400 च्या वर बंद झाला.
गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात 1750 शेअर्सची खरेदी झाली तर 1550 शेअर्सची विक्री झाली. याशिवाय 138 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
हेही वाचा: तज्ज्ञांचा आवडता स्टॉक देईल मजबूत परतावा...
आपण सध्या मंदीच्या स्थितीत असल्याचे कॅटॅलिस्ट वेल्थचे प्रशांत सावंत म्हणाले. निफ्टीही 16600 च्या पातळीवर पोहोचलेला नाही. 16500 च्या पातळीवर मोठा रझिस्टंस दिसून येत आहे. म्हणूनच सध्या ते नो ट्रेड झोनमध्ये असल्याचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
जोपर्यंत निफ्टी 16200 च्या खाली जात नाही, तोपर्यंत त्यात एक पुलआउट दिसू शकतो. 16500 ते 16600 मधील पातळी दिसल्यास, तुम्ही नफा बुक (Profit Booking) केला पाहिजे. जोपर्यंत तो या पातळीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ट्रेड करु नका असा सल्ला त्यांनी दिला.
हेही वाचा: 'हा' डिफेन्स शेअर येत्या वर्षात देईल दमदार परतावा
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
डॉ. रेड्डी (DRREDDY)
बीपीसीएल (BPCL)
रिलायन्स (RELIANCE)
आयशर मोटर्स (EICHERMOTORS)
बजाज ऑटो (BAJAJAUTO)
भारतीय कंटेनर निगम (CONCOUR)
एम फॅसिस (MPHASIS)
हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDUPETRO)
भारत फोर्ज (BHARATFORG)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Share Market Analysis Sensex And Nifty Prediction
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..