Share Market: हा शेअर येत्या काळात देईल दमदार रिटर्न | Cholamandalam Investment and Finance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market: 'हा' शेअर येत्या काळात देईल दमदार रिटर्न

दिवाळी सण येतोय, अशात चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून दमदार नफा कमवायचा तुमचा प्लान असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीवर (Cholamandalam Inv and Fin) बाय रेटींग दिले आहे. व्हेहीकल फायनान्स बिझनेसमध्ये वाढीचा  विश्वास मोतीलाल ओसवालने व्यक्त केला आहे.  कंपनी नव्या प्रॉडक्ट सेगमेंटमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणत आहे, ज्याचा कंपनीला फायदा होईल.

हेही वाचा: INVESTMENT : या योजनेत ५ लाख गुंतवा आणि १२४ महिन्यांत मिळवा दुप्पट रक्कम

याशिवाय, कंपनी आपल्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पुढील 12 ते 18 महिन्यांत व्हेहिकल फायनांसिंग सेक्टर मजबूत राहील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे येत्या काळात कंपनीच्या कर्ज वितरण व्यवसायात चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे. लोन अगेंस्ट प्रॉपर्टी, होम लोन आणि 3 नवीन बिझनेस सेगमेंटमध्ये कंपनीची स्थिती मजबूत होताना दिसेल. त्यामुळेच मोतीलाल ओसवाल यांनी चोलामंडलमला 925 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग दिले आहे.

हेही वाचा: Investment Tips: 100 रुपयांपासून सुरु करा SIP आणि मिळवा उत्तम परतावा

14 ऑक्टोबरला एनएसईवर हा शेअर 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 726.60 रुपयांवर होता. शेअरचा दिवसाचा नीचांक 724.50 रुपये होता. तर दिवसाचा उच्चांक 740.30 रुपये होता. स्टॉकने 06 सप्टेंबर 2022 रोजी 817.75 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला तर 20 डिसेंबर 2021 रोजी तो 469.25 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. कंपनीचे मार्केट कॅप 59,682.02 कोटी रुपये आहे.

हेही वाचा: Investment Tips: 100 रुपयांपासून सुरु करा SIP आणि मिळवा उत्तम परतावा

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.