esakal | बाजारात आठवड्याची सांगता सकारात्मकतेने!
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा व्यापारविषयक चर्चांना सुरुवात झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये आशावाद निर्माण होऊन आठवड्याच्या शेवट शेअर बाजार सकारात्मक झाला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 199 अंशांनी वधारून 31 हजार 642 पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 52 अंशांनी वधारला. तो 9 हजार 251 पातळीवर स्थिरावला.

बाजारात आठवड्याची सांगता सकारात्मकतेने!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन दरम्यान पुन्हा एकदा व्यापारविषयक चर्चांना सुरुवात झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये आशावाद निर्माण होऊन आठवड्याच्या शेवट शेअर बाजार सकारात्मक झाला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 199 अंशांनी वधारून 31 हजार 642 पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 52 अंशांनी वधारला. तो 9 हजार 251 पातळीवर स्थिरावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतानंतर सकाळच्या सत्रात आलेली तेजी मात्र दिवसअखेर कायम टिकवून ठेवण्यात प्रमुख निर्देशांकांना यश आले नाही. फायनान्शियल सर्व्हिसेस, ऑटो आणि मेटल क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर तेजी टिकवून ठेवण्यास अपयशी ठरले. परिणामी क्षेत्रनिहाय पातळीवर या निर्देशांकांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. फार्मा, एफएमसीजी, आयटी आणि मीडिया निर्देशांक वधारून बंद झाले. 

सेन्सेक्सच्या मंचावर हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले, टेक महिंद्रा, सनफार्मा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वधारले.

एसबीआय कार्ड्सला 83.5 कोटींचा नफा

कमॉडिटी बाजारात तेजी
जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन शिथिल करण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ लागल्याने कमॉडिटी बाजारात धातू आणि कच्च्या तेलाच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

रुपया वधारला
आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपया 23 पैशांनी वधारून डॉलरच्या तुलनेत 75.54 वर स्थिरावला