esakal | शेअर बाजारात घसरणीला ब्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

Share-Market

कोरोना विरोधातील लस विकसित करण्यात अमेरिकन कंपनीला यश मिळत असल्याच्या वृत्तानंतर मागील तीन सत्रांपासून सातत्याने घसरत असलेल्या भारतीय शेअर बाजाराला ब्रेक लागत मंगळवारी शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करून बंद झाला. परिणामी सेन्सेक्स 167 अंशांनी वधारून 30,196 वर बंद झाला. तर निफ्टी 56 अंशांनी वाढून 8,879 वर स्थिरावला.

शेअर बाजारात घसरणीला ब्रेक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

* सेन्सेक्स 167 अंशांनी वधारून 30,196 वर बंद
* निफ्टी 56 अंशांनी वाढून 8,879 वर स्थिरावला
* रुपया वधारला

कोरोना विरोधातील लस विकसित करण्यात अमेरिकन कंपनीला यश मिळत असल्याच्या वृत्तानंतर मागील तीन सत्रांपासून सातत्याने घसरत असलेल्या भारतीय शेअर बाजाराला ब्रेक लागत मंगळवारी शेअर बाजार सकारात्मक व्यवहार करून बंद झाला. परिणामी सेन्सेक्स 167 अंशांनी वधारून 30,196 वर बंद झाला. तर निफ्टी 56 अंशांनी वाढून 8,879 वर स्थिरावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान देशातील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने आणि सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधून निराशाच पदरी पडल्याने भारतीय शेअर बाजार सातत्याने नकारात्मक व्यवहार करत आहे. आर्थिक पॅकेजेसमधून फारसे काही हाती न लागल्याने बँकिंग आणि एनबीएफसी कंपन्यांवरील दबाव वाढत आहे. त्यातच अमेरिका आणि चीनमधील व्यापारविषयक संघर्ष नवे वळण घेत आहे परिणामी गुंतवणूकदारांमध्ये निराशा कायम आहे.

लॉकडाऊन काळात वेतन देणे, आता कंपन्यांवर नाही बंधनकारक 

क्षेत्रनिहाय पातळीवर मीडिया, मेटल आणि ऑटो निर्देशांक सर्वाधिक वधारले होते. तर, बँकिंग, रिएल्टी आणि फार्मा निर्देशांकामध्ये घसरण झाली होती. सेन्सेक्सच्या मंचावर एरटेलचा शेअर सर्वाधिक ११.३४ टक्क्यांनी वधारून बंद झाला. त्याचबरोबर ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी आणि पॉवरग्रीडचा शेअर सर्वाधिक वधारले होते. तर इंडसइंड बँक, रिलायन्स, एल अँड टी आणि एसबीआयच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण नोंदविण्यात आली.

लॉकडाऊनमुळे महसूल घटल्यामुळे स्टार्टअप 'व्हेंटिलेटर'वर

रुपया वधारला
आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपया २७ पैशांनी वधारून डॉलरच्या तुलनेत ७५.६४ वर स्थिरावला.

एफपीआय गुंतवणूकीत ६.४ अब्ज डॉलरची घट
कोविड १९च्या पार्श्वभूमीवर परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याने मार्च महिन्यात भारतीय भांडवली बाजारातील गुंतवणूक एकूण  ६.४ अब्ज डॉलरने कमी झाली.

रुपयात घसरण कायम राहण्याचा ब्रोकिंग फर्मचा अंदाज
कोरोनाविषाणूवरील लस विकसित करण्यात पहिल्या टप्प्यात यश आले असल्याच्या वृत्तानंतर शेअर बाजाराबरोबर चलन बाजारात देखील रुपयात सुधार दिसून आला. मात्र ही वाढ तात्पुरत्या स्वरूपातील असून, देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि लॉक डाउनचे स्वरूप लक्षात घेता रुपयात घसरण कायम राहण्याची शक्यता असल्याचे रेलिगेअर या ब्रोकिंग फर्मने म्हटले आहे.

loading image
go to top