esakal | शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद; निर्देशांक सेन्सेक्समध्ये 375 अंशांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

sahre market

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये  375 अंशांची वाढ झाली. दिवसअखेर सेन्सेक्स 63  अंशांच्या घसरणीसह  30 हजार 609 अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये  10 अंशांची घसरण झाली.

शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद; निर्देशांक सेन्सेक्समध्ये 375 अंशांची वाढ

sakal_logo
By
Share market closes with marginal decline

मुंबई : शेअर बाजारात सकाळच्या सत्रात तेजीचे वातावरण होते. बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 375 अंशांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 9100 अंशांवर पोचला होता. मात्र दुपारच्या सत्रात  गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा सुरू झाल्याने बाजारात घसरण झाली.दिवसअखेर सेन्सेक्स 63 अंशांच्या घसरणीसह 30 हजार 609 अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये 10 अंशांची घसरण झाली. तो  9 हजार 29 अंशांवर स्थिरावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

क्षेत्रीय पातळीवर वित्त संस्था, बँका, फार्मा कंपन्या, ऑटो कंपन्यांचे शेअर तेजीत होते.

एअरटेलच्या शेअरमध्ये घसरण
भारती एअरटेलचे प्रवर्तक 1 अब्ज डॉलर मूल्याचे शेअर  ब्लॉक डीलच्या ममधमातून विक्री करणार असल्याने भारती एअरटेलच्या शेअरमध्ये 5 टक्के घसरण झाली. परिणामी बीएसई टेलिकॉम निर्देशांकात 3 टक्क्यांची घसरण झाली. 

हेही वाचा : कोरोनाच्या संकटात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 'या' टिप्स घ्या लक्षात​

जागतिक बाजार
आशियातील प्रमुख शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. जपान शेअर बाजार निर्देशांक निक्केई 225 अंशांनी वधारला. त्यापाठोपाठ हाँगकाँगचा हॅंगसेंग, शांघाई कम्पोझिट इंडेक्स देखील तेजीसह बंद झाले.

टाटा समूहाकडून वेतन कपात; सीईओ आणि एमडींच्या वेतनात 20 टक्क्यांची कपात

कच्च्या तेलाचे भाव स्थिर
 जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मंगळवारी स्थिर होत्या. ब्रेंट क्रूडच्या दरात 5 टक्क्यांची घसरण झाली. क्रूडचा भाव 35.07 डॉलरवर पोचला आहे. 

सेन्सेक्स मंचावरील आघाडीच्या 30 कंपन्यांपैकी 12 कंपन्यांचे शेअर घसरणीसह बंद झाले.

शेअर वधारले:
 टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, मारुती, आयटीसी, नेस्ले, टाटा स्टील, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, एल अँड टी,पॉवरग्रीड, ओएनजीसी, एशियन पेंट, एसबीआय, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा

शेअर घसरले:
 रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, हिंदुस्थान युनिलीव्हर, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, सन फार्मा, टीसीएस, भारती एअरटेल

loading image
go to top