शेअर बाजारात, आठवड्याचा शेवट तेजीत

वृत्तसंस्था
Friday, 5 June 2020

गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर बंद होण्यास यशस्वी होत असल्याने निफ्टी 10 हजार अंशांच्या पातळीवर टिकून राहण्यास यशस्वी ठरला आहे. शिवाय जिओमध्ये आणखी एका परदेशी कंपनीने गुंतवणूक केल्याने देशांतर्गत बाजारात गुबतवणूकदारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

मुंबई - भारतीय शेअर बाजार शुक्रवारी वधारून बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 306 अंशांनी वधारून 34 हजार 287 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 113 अंशांची वाढ झाली. तो 10 हजार 142 अंशांवर बंद झाला.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर बंद होण्यास यशस्वी होत असल्याने निफ्टी 10 हजार अंशांच्या पातळीवर टिकून राहण्यास यशस्वी ठरला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवाय जिओमध्ये आणखी एका परदेशी कंपनीने गुंतवणूक केल्याने देशांतर्गत बाजारात गुबतवणूकदारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. परिणामी शुक्रवारी देखील भारतीय शेअर बाजाराची सांगता सकारात्मक पातळीवर झाली. 

गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 2905 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. 

स्टेट बँकेला 3,580 कोटींचा नफा; व्याजापोटी बँकेला 22 हजार  954 कोटीचे उत्पन्न

सेन्सेक्सच्या मंचावर एसबीआय, टाटा स्टील, एचडीएफसी, बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेचा शेअर प्रत्येकी 7.90 टक्क्यांपर्यंत वधारून बंद झाले. तर, टीसीएस, बजाज ऑटो, नेस्ले इंडिया आणि इन्फोसिसच्या शेअरमध्ये 2.19 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. 

चलन बाजारात रुपया  75.58 रुपये प्रतिडॉलरवर स्थिरावला.

आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share market closes on positive note