esakal | स्टेट बँकेला 3,580 कोटींचा नफा; व्याजापोटी बँकेला 22 हजार  954 कोटीचे उत्पन्न 
sakal

बोलून बातमी शोधा

state-bank-of-india

गेल्या वर्षी याच तिमाहीत व्याजापोटी बँकेला 22 हजार 954 कोटीचे उत्पन्न मिळाले होते. नेट इंटरेस्ट मार्जिन 3.02 टक्के असून त्यात 0.65 टक्क्याची घसरण झाली आहे. यंदा नफ्यात चार पटीने वाढ झाली आहे.

स्टेट बँकेला 3,580 कोटींचा नफा; व्याजापोटी बँकेला 22 हजार  954 कोटीचे उत्पन्न 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेला (एसबीआय) 3,580 कोटी रुपयांचा तिमाही नफा झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने 838 कोटी रुपयांचा नफा नोंदविला होता. यंदा नफ्यात चार पटीने वाढ झाली आहे.  शुक्रवारी एसबीआयने तिमाही निकाल जाहीर केला.

 बँकेला व्याजातून मिळालेल्या उत्पन्नात वार्षिक आधारावर 0.8 टक्के घसरण झाली आहे. ते आता मार्च तिमाहीत 22 हजार 766 कोटी रुपयांवर पोचले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत व्याजापोटी बँकेला 22 हजार  954 कोटीचे उत्पन्न मिळाले होते. नेट इंटरेस्ट मार्जिन 3.02 टक्के असून त्यात 0.65 टक्क्याची घसरण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चौथ्या तिमाहीत देशभरात कोरोनाचे संकट गडद झाले. शिवाय रिझर्व्ह बँकेने देखील सहा महिने "ईएमआय हॉलिडे' दिल्याने बँकांची कामगिरी खालावली आहे. बँकेसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे बुडीत कर्जाचे प्रमाण देखील कमी झाल्याचे बँकेने सांगितले आहे. चौथ्या तिमाहीत बुडीत कर्जाचे प्रमाण 6.15 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. 

ऍमेझॉन भारती एअरटेलमध्ये २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची शक्यता

व्याजातील उत्पन्नात मात्र घसरण झाली आहे. डिसेंबरच्या तिमाहीत हे प्रमाण 6.91 टक्के होता. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत ते 7.53 टक्के होते. "ईएमआय हॉलिडे'चा 21.8 टक्के ग्राहकांनी घेतला लाभ

रिझर्व्ह बँकेने कोरोना संकटाच्या काळात कर्जदारांना दिलासा देत कर्ज वसुलीला 6 महिन्यांसाठी मुदत दिली आहे. या सुविधेचा 21.8 टक्के ग्राहकांनी लाभ घेतला आहे. एकूण कर्ज वितरणाच्या हे प्रमाण 23 टक्के आहे, अशी माहिती एसबीआयने दिली.

जिओचा आणखी एक मोठा करार; आता 'ही' कंपनी करणार गुंतवणूक

loading image