
Share Market Closing : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही तेजी
Share Market Closing : भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. बाजाराने खालच्या पातळीवरून पुनरागमन केले असले तरी सेन्सेक्समध्ये 600 अंकांची तर निफ्टीमध्ये 150 अंकांची घसरण झाली होती.
पण आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 304 अंकांनी घसरून 60,353 वर तर NSE चा निफ्टी 51 अंकांनी 18,000 च्या खाली 17,992 अंकांवर बंद झाला.

BSE India
आज बाजारात ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल, एनर्जी सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड
बँकिंग, आयटी, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 14 समभाग वाढीसह बंद झाले तर 16 तोट्यासह बंद झाले.
हेही वाचा: New Rule : SBI आणि HDFC बँकेने करोडो ग्राहकांसाठी बदलले नियम; जाणून घ्या काय आहेत नियम
शेअर बाजारात दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले असले तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. आज BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप रु. 282.03 लाख कोटी इतके आहे. बुधवारी ते 281.61 लाख कोटी रुपये होते.
NBFC क्षेत्रातील दिग्गज बजाज फायनान्सचे शेअर्स गुरुवारी 8.2 टक्क्यांनी घसरले. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या कर्जवाढीत घट झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर विकले आहेत.