Share Market Closing : गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर शेअर बाजार तेजीत; आयटीच्या 'या' शेअर्समध्ये तेजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Today

Share Market Closing : गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर शेअर बाजार तेजीत; आयटीच्या 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Closing : गेल्या आठवड्यात तीन दिवसांच्या घसरणीनंतर आठवड्याचा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारासाठी चांगला राहिला. जागतिक संकेतांमुळे शेअर बाजार सोमवारी उच्च पातळीवर उघडला आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे ही गती कायम राहिली.

सेंसेक्स पुन्हा 60,000 आणि निफ्टी 18,000 पार करण्यात यशस्वी झाला. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 791 अंकांनी वाढून 60,691 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 230 अंकांच्या वाढीसह 18,089 अंकांवर बंद झाला.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला...

BSE India

BSE India

बाजारातील या मोठ्या तेजीमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रातील समभाग तेजीसह बंद झाले.

बँक निफ्टी, निफ्टी आयटी, ऑटो, एनर्जी, मेटल्स, ऑइल अँड गॅस आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले.

हेही वाचा: Bank Account : RBI ने बँक खात्याशी संबंधित बदलले नियम; खातेधारकांना करावे लागणार 'हे' महत्वाचे काम

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागही तेजीने बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 3 समभाग घसरले, तर उर्वरित 27 समभाग वधारले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 44 समभाग वाढीसह तर 6 समभाग तोट्यासह बंद झाले.

भारतीय बाजाराला आज जागतिक बाजारातून पाठिंबा मिळाला. अमेरिका, युरोपसह आशियाई बाजार तेजीत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचा मूडही बदलला असून, तेजी परत आली आहे.

शेअर बाजाराची तीन दिवसांपासून सुरू असलेली घसरण आज संपली आली. आजच्या तेजीत आयटी निर्देशांकाचा सर्वाधिक वाटा आहे. एचसीएल, टीसीएस 3 टक्क्यांहून अधिक वाढले. 36 पैशांच्या मजबूतीसह डॉलरच्या तुलनेत रुपया 82.36 वर बंद झाला.

आठ कंपन्यांचे तिमाही निकाल आज येणार :

आठ कंपन्या डिसेंबर तिमाहीच्या कमाईचे आकडे आज जाहीर करतील. टाटा समूहाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चा निकालही आज लागणार आहे.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

बाजारातील तेजीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. BSE मधील सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप रु. 282.92 लाख कोटींवर पोहोचले, शुक्रवार मार्केट कॅप 6 जानेवारी 2023 रोजी रु. 279.81 लाख कोटी होते. आजच्या तेजीच्या काळात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.10 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.