Share Market Closing : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद; एफएमसीजी-आयटी समभाग घसरले

आयटी आणि एफएमसीजी समभागांमध्ये नफा बुकिंगमुळे बाजारात घसरण दिसून आली आहे.
Share Market
Share Market Sakal

Share Market Closing : आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. आयटी आणि एफएमसीजी समभागांमध्ये नफा बुकिंगमुळे बाजारात घसरण दिसून आली आहे.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 253 अंकांनी घसरून 60,602 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 85 अंकांनी घसरून 18,022 अंकांवर बंद झाला.

BSE India
BSE IndiaSakal

आजच्या व्यवहारात बँकिंग, तेल आणि वायू क्षेत्रातील समभाग तेजीसह बंद झाले. त्यामुळे ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी आणि इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागही घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 9 समभाग वाढीसह बंद झाले तर 21 समभाग तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 12 समभाग वाढीसह तर 38 समभाग तोट्यासह बंद झाले.

Share Market
Budget 2023 : मोदी सरकार देशातील श्रीमंतांच्या संपत्तीवर कर लावणार का?अर्थसंकल्पापूर्वी हा मुद्दा का आहे चर्चेत

आजच्या ट्रेडिंग सत्रात पॉवर ग्रिड 1.20 टक्के, एचडीएफसी बँक 1.02 टक्के, आयटीसी 0.72 टक्के, टाटा मोटर्स 0.59 टक्के वाढीसह बंद झाले.

एशियन पेंट्स 2.79 टक्क्यांनी, बजाज फायनान्स 2.57 टक्क्यांनी, नेस्ले 2.37 टक्क्यांनी आणि बजाज फिनसर्व्ह 1.58 टक्क्यांनी घसरले.

गुंतवणूकदारांचे नुकसान :

आजच्या व्यवसायात, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 280.24 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे गुरुवारी 281.66 लाख कोटी रुपये होते. या घसरणीमुळे 1.42 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com