Share Market Closing : Sensex मध्ये 631 अंकाची घसरण, 'या' मोठ्या शेअर्सला फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

Share Market Closing : Sensex मध्ये 631 अंकाची घसरण, 'या' मोठ्या शेअर्सला फटका

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली होती. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. आज सुरवातीच्या सत्रातही तेजी कायम होती मात्र आज दुसऱ्याच दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला.

आज शेअर बाजारमध्ये शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 631 अंकाच्या घसरणीसह 60,115 वर बंद झाला तर निफ्टी 187 अंकाच्या 17,914 घसरणीसह वर बंद झाला.

आज सुरवातीच्या सत्रात शेअर बाजारात आज किंचित चढ-उताराने सुरुवात झाली होती. सेन्सेक्स 57 अंकांच्या वाढीसह 60,805 वर तर निफ्टी 20 अंकांच्या वाढीसह 18,121 अंकांवर उघडला होता त्याचवेळी बँक निफ्टी 59 अंकांच्या वाढीसह 42642 वर उघडला होता.

हेही वाचा: Stock Market : 1 लाखाचे 96 लाख, 6 वर्षात 'या' शेअरची कमाल...

आज शेअर बाजारमध्ये 17 शेअर्समध्ये तेजी तर 33 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. यात विशेष म्हणजे टाटा मोटर्स, टाटा स्टील, पॉवरग्रीड या शेअर्स मध्ये तेजी दिसून येत आहे तर BAJFINANCE, HDFCBANK, RELIANCE, TCS सारख्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

हेही वाचा: Share Market Opening : सेन्सेक्स-निफ्टीत पडझड; शेअर बाजार अस्थिर राहण्याचे संकेत

सुरुवातीच्या सत्रात टाटा मोटर्स, टाटा स्टील, एम अँड एम, पॉवरग्रीड, सन फार्मा, टायटन, एचयूएल, एल अँड टी आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये दिसून आली होती तर याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, विप्रो, रिलायन्स, एचसीएल टेक, एशियन पेंट्स आणि आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली होती.