Stock Market : 1 लाखाचे 96 लाख, 6 वर्षात 'या' शेअरची कमाल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stock Split

Stock Market : 1 लाखाचे 96 लाख, 6 वर्षात 'या' शेअरची कमाल...

शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक्सने कायमच आपल्या गुंतवणुकदारांना कमी कालावधीत दमदार परतावा दिला आहे. असाच एक मल्टीबॅगर स्टॉक म्हणजे आदित्य व्हिजन लिमिटेड (Aditya Vision Limited). गेल्या 6 वर्षांत या शेअरने त्यांच्या गुंतवणूकदारांना 9,380 टक्के इतका मोठा नफा दिला आहे.

डिसेंबर 2016 मध्ये आदित्य व्हिजनच्या एका शेअरची किंमत 15 रुपये होती. तर आता हा शेअर तब्बल 1450 रुपये प्रति शेअरवर गेला आहे. याचा अर्थ सुमारे 6 वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशात सुमारे 96 पट वाढ झाली. शिवाय, याने 5 वर्षात गुंतवणूकदारांना 1346% चा मजबूत परतावा दिला आहे. (stock market news)

या शेअरने अवघ्या 6 वर्षात गुंतवणूकदारांना प्रचंड नफा दिला आहे. जर तुम्ही डिसेंबर 2016 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुमची संपत्ती 96 पटीने वाढून 96 लाख रुपये झाली असती. या वर्षी ऑक्टोबरमध्ये शेअरने 1,845 रुपयांचा ऑल टाइम हाय गाठला होता.

हेही वाचा: Stock Market : केवळ 2 वर्षात 'या' स्टॉकने एका लाखाचे केले एक कोटी

आदित्य व्हिजन लिमिटेड हा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि टॅब्लेट यांसारख्या डिजिटल गॅझेट्सपासून एंटरटेनमेंट सॉल्यूशन आणि होम अप्लायंसेजपर्यंत 10,000 हून अधिक उत्पादनांसह एक जागतिक ब्रँड आहे.

आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 43 टक्क्यांनी वाढून 259.6 कोटी झाला. एक वर्षापूर्वी हा आकडा 182.09 कोटी रुपये होता. मागील तिमाहीत कंपनीचा महसूल 438.51 कोटी रुपये होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.