शेअर बाजार तेजीत पण टाटाच्या शेअर्समध्ये घसरण

अखेरच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला.
Share Market News updates, Stock Market News today
Share Market News updates, Stock Market News todaysakal

आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. अखेरच्या सत्रात शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 246 अंकाच्या तेजीसह 54,767 वर बंद झाला तर निफ्टी 50 अंकाच्या तेजीसह 16,328 वर बंद झाला.

आज शेअर बाजारात 33 शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर 17 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. HCLTECH, TATAMOTORS, KOTAKBANK, CIPLA, TATACONSUM सारख्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण दिसून येत आहे.

Share Market News updates, Stock Market News today
Share Market: शेअर बाजारात घसरण, Sensex आणि Nifty मध्ये उतार

आज सुरवातीच्या सत्रात सेन्सेक्स 186 अंकाच्या घसरणीसह 54,335 वर सुरू झाला तर निफ्टी 54 अंकाच्या घसरणीसह 16,223 सुरू झाला.

सोमवारी पहिल्या दिवशी बाजारात तेजी पाहायला मिळाली. हेवीवेट स्टॉक्स आणि सर्व क्षेत्रातील खरेदी यामुळे सेन्सेक्स 760.37 अंकांनी म्हणजेच 1.41 टक्क्यांच्या वाढीसह 54,521.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 229.30 अंकांच्या म्हणजेच 1.43 टक्क्यांच्या वाढीसह 16,278.50 वर बंद झाला.

Share Market News updates, Stock Market News today
आरबीआयचा महाराष्ट्रातील बँकेला दणका; काढता येणार केवळ 15 हजार

चांगल्या जागतिक संकेतांमुळे बाजारातील वातावरण सुधारले आणि सर्वच सेक्टरमधील खरेदीमुळे सेन्सेक्स 54000 च्या वर आज बंद झाला नुकत्याच झालेल्या घसरणीमुळे काही शेअर्स अतिशय आकर्षक किंमतींवर आहेत. अशा स्थितीत आयटी, मेटल आणि टेलिकॉम शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com