FASTag मधील Balance कसा तपासायचा? या चार सोप्या टीप्स फॉलो करा | How to Check Fastag Balance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How to Check Fastag Balance

FASTag मधील Balance कसा तपासायचा? या चार सोप्या टीप्स फॉलो करा

राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना टोल नाक्यावर टोल भरताना FAStTag चा वापर केला जातो. टोल भरताना रांगेत न लागता सहजतेने तो भरला जावा म्हणून नॅशनल हायवेस अथोरिटी ऑफ इंडिया ने २०१४ पासूनच फास्टॅग ही नवीन कल्पना आणली.

FASTag मुळे रोख रक्कम जवळ न ठेवताही टोल भरणे साहजिकच आहे. जेव्हा तुम्ही प्रवास करत असता आणि अनेकदा तुमच्या FASTag मध्ये किती शिल्लक आहे याची खात्री नसते. तुमची बॅलेन्स तपासण्यासाठी आम्ही तुम्हाला चार सोपी टीप्स सांगणार आहोत.(How to Check Fastag Balance)

हेही वाचा: फोन एकदाच चार्ज करा आणि २ दिवस चालवा... कसे ते पाहा...

पद्धत १-

१.तुमच्या स्मार्टफोनवर, Play Store किंवा App Store वर जा
२.तुमच्या Android किंवा iPhone डिव्हाइसवर ‘My FASTag’ अॅप इंस्टॉल करा.

३.तुमची लॉग-इन माहिती भरा.

४. आता तुम्ही तुमच्या खात्यातील FASTagचा बॅलेन्स तपासू शकता.

हेही वाचा: Television pre-booking offer : साउंड बार, व्हिडिओ कॉल कॅमेरा मोफत मिळणार

पद्धत २ -

१.तुम्ही ज्या बँकेशी तुमचे FASTag खाते लिंक केले आहे त्या बँकेच्या वेबसाइटवर जा.

२.तुमच्या ओळखपत्रांसह, FASTag पोर्टलवर लॉग इन करा.

३.ड्रॉप-डाउन मेनूमधून बॅलेन्स पहा

हेही वाचा: टेक्नोहंट : ‘एस्पायर ७’चा तंत्रविस्तार

पद्धत ३ -

एसएमएस पद्धत अगदी सोपी आहे आणि त्यासाठी कोणत्याही अधिकच्या स्टेप्स फॉलो करायची आवश्यकता नाही. एकदा तुम्ही FASTag सेवेसाठी रेजिस्ट्रेशन केल्यानंतर टोल बूथवर तुमच्या FASTag खात्यातून रक्कम वजा केल्यावर तुम्हाला एसएमएस येणार. हा एसएमएस तुम्हाला तुमच्या FASTag खात्यातील बॅलेन्स, टोल पेमेंट आणि रिचार्ज बद्दल माहिती देणार.

हेही वाचा: सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पद्धत ४ - याशिवाय तुमचा मोबाइल नंबर NHAI च्या प्रीपेड वॉलेटमध्ये रेजिस्टर असेल आणि तुम्ही प्रीपेड FASTag ग्राहक असाल तर तुम्ही टोल-फ्री नंबर +91-8884333331 वर कॉल करून तुमच्या FASTag खात्यातील बॅलेन्स तपासू शकता. ही सुविधा 24/7 सुरू असणार. जर ग्राहकाने पुरेसा बॅलेन्स ठेवला नाही तर FASTag टोल प्लाझावर Black List मध्ये येतो.

Web Title: How To Check Balance In Fastag Follow These Four Methods

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top