
शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला
मुंबई : आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये ३२६.८४ अंकांची म्हणजेच ०.६२ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली. त्यामुळे सेन्सेक्स ५३,२३४.७७ अंकांवर स्थिरावला. निफ्टीमध्ये ८३.३० अंकांची म्हणजेच ०.५३ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे निफ्टी १५,८३५.३५ अंकांवर स्थिरावला.
सकाळी शेअर बाजारात किंचित घसरण दिसून आली. सेन्सेक्स ६७.०९ अंकांनी म्हणजेच ०.०९ टक्क्यांनी घसरला व ५२,८६०.१५ अंकांवर स्थिर होत बाजार सुरू झाला होता. निफ्टी १९.१० अंकांनी म्हणजेच ०.१२ टक्क्यांनी वधारला व बाजार उघडताच निफ्टी १५,७५२.४० अंकांवर स्थिर झाला होता.
हेही वाचा: सोन्याच्या दरांत स्थिरता; प्रतिग्रॅम दर साडेचार हजारांहून अधिक
गेल्या काही आठवड्यांच्या घसरणीनंतर मागच्या आठवड्यात बाजार हिरव्या रंगात बंद झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. यात ऑटो सेक्टरने महत्त्वाची भूमिका बजावली, तसेच वस्तूंच्या किमतीतही सुधारणा झाली आहे.
हेही वाचा: BSNLच्या वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी ! हे फायदे होणार कमी...
दुसरीकडे, विंडफॉल टॅक्सच्या बातम्यांमुळे एनर्जी शेअर्समध्ये बरीच घसरण दिसली. एनर्जी इंडेक्स जवळपास 4 टक्क्यांनी घसरला. सर्वात जास्त दबाव पीएसई, मेटल शेअर्सवर होता, त्यानंतर एफएमसीजी, रियल्टी, फार्मा शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून आला. बँकिंग शेअर्समध्ये रिकव्हरी दिसली.
Web Title: Share Market Closing Update 4 July 2022 Sensex And Nifty Rises
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..