
BSNLच्या वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी ! हे फायदे होणार कमी...
मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने अलीकडेच तीन नवीन प्री-पेड प्लॅन लाँच केले आहेत आणि आता कंपनीने आपल्या अनेक प्री-पेड प्लॅन्स एकाच वेळी महाग केले आहेत. टेलिकॉम टॉकने सर्वप्रथम ही माहिती दिली आहे. आता BSNL ने एकाच वेळी आपल्या तीन प्री-पेड प्लॅनमध्ये उपलब्ध वैशिष्ट्ये कमी केली आहेत.
हेही वाचा: ....म्हणून हा मुलगा घोड्यावरून फूड डिलिव्हरीसाठी निघाला
BSNL च्या ९९ रुपयांच्या प्लॅनचे नवीन फायदे
BSNL च्या 99 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये पूर्वी अमर्यादित कॉलिंगसह 22 दिवसांची वैधता मिळायची पण आता या प्लॅनची वैधता 18 दिवसांची झाली आहे म्हणजेच तुम्ही वैधतेच्या बाबतीत 4 दिवस गमावले आहेत. इतर सर्व सुविधा पूर्वीप्रमाणेच मिळत राहतील.
हेही वाचा: फाटलेल्या दुधापासून करा हे चविष्ट पदार्थ
बीएसएनएलचा 118 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या 118 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 500 MB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे. आता नवीन बदलामध्ये या प्लानची वैधता 20 दिवसांची झाली आहे, जी पूर्वी 26 दिवसांची होती. सोप्या भाषेत सांगायचे तर, या प्लॅनची किंमत देखील सुमारे 4.53 रुपयांनी वाढली आहे.
BSNL च्या 319 रुपयांच्या प्लॅनचे नवीन फायदे
बीएसएनएलचा 319 रुपयांचा प्लान 75 दिवसांच्या वैधतेसह येत असे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 300 एसएमएस आणि 10 जीबी डेटा उपलब्ध आहे. आता या प्लानची वैधता 65 दिवसांची झाली आहे. म्हणजेच हा प्लॅनही जवळपास 4.25 रुपयांनी महाग झाला आहे.
Web Title: Bad News For Bsnl Users These Benefits Will Be Less
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..