
शेअर मार्केटमधील घसरणीला अखेर ब्रेक, तब्बल 40 शेअर्समध्ये तेजी
Share Market Update: आठवड्याच्या सुरवातीपासून शेअर बाजारात अस्थिरता कायम होती मंगळवारी शेअर बाजार प्रचंड अस्थिरतेसह घसरणीसह बंद झाला. मात्र आज शेअर बाजार पहिल्या सत्रात तेजीसह सुरू झाला तर शेवटच्या सत्रातही शेअर बाजार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स 671 अंकांच्या तेजीसह 53,805 वर बंद झाला तर निफ्टी 200 अंकांच्या तेजीसह 16,010 वर बंद झाला. (share market closing update 6 july 2022)
आज शेअर बाजारात तब्बल 40 कंपन्याचे शेअर्समध्ये तेजी दिसून आली तर फक्त 10 कंपन्याच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. यात प्रामुख्याने TATASTEEL, COALINDIA, RELIANCE, HDFCLIFE, ONGC सारख्या कंपन्याचा समावेश आहे.
हेही वाचा: सोन्याच्या दरात आज वाढ, चांदीही महागली; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
आज शेअर बाजार तेजीसह सुरू झाला. सेन्सेक्स 235 अंकांच्या तेजीसह 53,371वर सुरू झाला तर निफ्टी 50 अंकांच्या तेजीसह 15,860 वर सुरू झाला.
मंगळवारी शेअर बाजार लाल रंगात अर्थात घसरणीसह बंद झाला. बाजारात मंगळवारी बरीच उलथापालथ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 100.42 अंकांनी म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 53,134.35 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 24.50 अंकांनी म्हणजेच 0.15 टक्क्यांनी घसरून 15,810.85 वर बंद झाला.
हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजी, मात्र गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक कायम
विक्रीचा दबाव असूनही, निफ्टीने नजीकच्या काळात त्याच्या मूव्हिंग एव्हरेजवर राहण्यात यश मिळविले. जोपर्यंत निफ्टी 15800 च्या वर राहील तोपर्यंत कल सकारात्मक असण्याची अपेक्षा आहे. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 16000 आणि 16200 वर रझिस्टंस दिसून येत आहे.
Web Title: Share Market Closing Update 6 July 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..