Share Market: शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स 770 तर निफ्टी 216 अंकांनी घसरला

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण
Share Market Updates
Share Market Updatessakal

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. जगभरातील शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजारात पहिल्या सत्रापासून ही घसरण पाहायला मिळाली. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 770 अंकांची घसरण झाली तर निफ्टीमध्ये 216 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 1.29 टक्क्यांची घसरण होऊन तो 58,766 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 1.22 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,542 अंकांवर स्थिरावला आहे.

सकाळच्या सत्रात इन्फोसिस 2.34 टक्के, टीसीएसमध्ये 2.17 टक्के, रिलायन्समध्ये 1.90 टक्के, एचडीएफसीमध्ये 1.75 टक्के, नेस्लेमध्ये 1.56 टक्के, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.55 टक्के, एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात 1.54 टक्के, एचसीएल टेकच्या शेअर दरात 1.53 टक्क्यांची घसरण झाली आहे.

तर आज सुरवतीच्या सत्रात राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्समध्ये 493 अंकांची घसरण झाली तर निफ्टीमध्ये 135 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.70 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,122 अंकांवर सुरू झाला तर निफ्टीमध्ये 0.67 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,647 अंकांवर सुरू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com