Share Market Crash : शेअर बाजार कोविडमुळे कोसळला की, दुसरचं काही कारण? जाणून घ्या...

गेल्या चार दिवसांत सेन्सेक्स 2000 अंकांनी घसरला आहे
Share Market
Share MarketSakal

Share Market Crash : चीनमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारताचे आरोग्य मंत्री बैठक घेणार असल्याची बातमी येताच शेअर बाजाराने यू-टर्न घेतला आणि गेले चार दिवस, बाजारात मोठी घसरण दिसून आली.

शुक्रवारी शेअर बाजारात घसरणीमध्ये सेन्सेक्स 1000 आणि निफ्टी 300 अंकांच्या खाली घसरले. गेल्या चार दिवसांत सेन्सेक्स 2000 अंकांनी घसरला आहे, तर निफ्टी 580 अंकांनी घसरला आहे.

गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे 15 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण प्रश्न असा पडतो की बाजारातील ही घसरण केवळ कोविडच्या बातम्यांमुळे झाली आहे की, या घसरणीचे कारण कोविडपेक्षा वेगळे आहे?

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

बाजाराच्या घसरणीची कारणे :

अमेरिका-युरोपमध्ये मंदी :

अमेरिका आणि युरोपमध्ये मंदीची चर्चा आहे. अमेरिकेत महागाई रोखण्यासाठी फेड रिझर्व्ह बँक व्याजदरात वाढ करत आहे आणि हे असेच सुरू राहिल्यास आंशिक मंदी येऊ शकते. असे झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणे साहजिक आहे.

कोविडची चिंता :

कोविडचा नवीन प्रकार पुन्हा गुंतवणूकदारांना त्रासदायक ठरत आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याचा फटका जपान, दक्षिण कोरियालाही बसला आहे. जर विमान प्रवास सुरू असेल तर भारतात संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो आहे. असे झाल्यास, प्रवासापासून विविध क्षेत्रांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले जाऊ शकतात, ज्यामुळे बाजारात घसरण दिसून येत आहे.

Share Market
Share Market : 'हा' शेअर येत्या काळात देईल तगडा परतावा, आताच घेऊन ठेवा, तज्ज्ञांचा सल्ला...

जपान मध्ये चलनवाढ :

जपानमधील महागाईने नोव्हेंबरमध्ये 40 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे तिथल्या बाजारात घसरण आहे, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ जपानकडून कडक आर्थिक धोरणाचे संकेत मिळाल्याने बाजारातही निराशा आहे.

ख्रिसमस आणि नवीन वर्षांची सुट्टी :

दरवर्षी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी गुंतवणूकदार सुट्टीवर जातात. अशा स्थितीत बाजारातील गुंतवणूकीत कमालीची घट होते. त्यामुळे बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com