आज शेअर बाजाराचा मूड कसा असेल? कोणत्या शेअर्सवर लक्षकेंद्रित कराल

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
Share Market
Share MarketSakal
Summary

पुन्हा एकदा भारतीय बाजारात एफआयआयकडून खरेदीचे पुनरागमन हे चांगले लक्षण असल्याचेही ते म्हणाले.

संमिश्र जागतिक संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे शेअर बाजार (Share Market) सोमवारी एक टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स (Sensex) 571.44 अंकांनी म्हणजेच 0.99 टक्क्यांनी घसरून 57,292.49 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 169.45 अंकांनी म्हणजेच 0.98 टक्क्यांनी घसरून 17,117.60 वर बंद झाला.

Share Market
आज शेअर बाजारात काय स्थिती असेल? टॉप 10 शेअर्स कोणते ?

रशिया आणि युक्रेन यांच्यातील गंभीर संघर्ष आणि आखाती प्रदेशातील अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे बाजारात विक्रीचे वर्चस्व राहिल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी म्हणाले. पुन्हा एकदा भारतीय बाजारात एफआयआयकडून खरेदीचे पुनरागमन हे चांगले लक्षण असल्याचेही ते म्हणाले.

आज कसा असेल बाजाराचा मूड ?

सोमवारच्या व्यवहारात निफ्टीची सुरुवात सकारात्मक झाली, पण दिवसभर जसजसा व्यापार वाढत गेला तसतसा बाजार ही तेजी कायम ठेऊ शकला नसल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी यांनी सांगितले. विकली चार्टवरून हे स्पष्ट होते की निफ्टीने 20 आठवड्यांची मूव्हिंग एव्हरेज गाठली आहे, जिथून तो छोट्या कंसोलिडेशनच्या टप्प्यात जात आहे.

Share Market
मजबूत फंडामेंटल्सचे 5 शेअर्स वर्षभरात देतील 73 टक्के परतावा, तज्ज्ञांना विश्वास

निफ्टीला 17000 जवळ असलेल्या 200-DMA वर सपोर्ट आहे. अशा परिस्थितीत 17000 च्या दिशेने येणारी कोणतीही घसरण बाजारात खरेदी वाढवू शकते अशी अपेक्षा आहे. तर क्लोजिंग बेसिसवर, जोपर्यंत निफ्टी 17000 च्या खाली जात नाही, तोपर्यंत आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूला, निफ्टीसाठी 17353 च्या आसपास रझिस्टंस आहे. जर निफ्टीने वरच्या बाजूला त्याने ही पातळी तोडली तर तो 17500 च्या जवळ जाईल असेही ते म्हणाले.

Accenture च्या चांगल्या निकालांचा परिणाम आणि मार्गदर्शन भारतीय IT कंपन्यांना बळ देऊ शकते असे हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणाले. तांत्रिक आघाडीवर, निफ्टीला 17,000 वर सपोर्ट आणि 17,500 वर रझिस्टंस आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 35,500 स्तरावर सपोर्ट आणि 36,500 स्तरावर रझिस्टंस आहे.

Share Market
शेअर बाजारात आज कशी असेल स्थिती ? हे ठरू शकतात टॉप 10 शेअर्स

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

- कोल इंडिया (COALINDIA)

- हिन्दाल्को (HINDALCO)

- यूनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

- ओएनजीसी (ONGC)

- एचडीएफसी बँक (HDFCBANK)

- ऑरोफार्मा (AUROPHARMA)

- वेदांत लिमिटेड (VEDL)

- जिंदाल स्टील (ZINDALSTEL)

- मुथूट फायनान्स (MUTHOOTFIN)

- भारतीय इस्पात प्राधिकरण (SAIL)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com