आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा घटक, 'आरोग्य विमा' 

विजय तावडे
Tuesday, 2 June 2020

आपण आर्थिक स्थैर्यासाठी, संपत्ती निर्मितीसाठी बचत करत असतो, गुंतवणूक करत असतो. मात्र जर एखादा मोठा खर्च अचानक उद्भवला तर आपली बहुतांश बचत आणि गुंतवणूक खर्ची पडण्याची शक्यता असते. असाच एक महत्त्वाचा खर्च आहे, वैद्यकीय खर्च. मागील काही वर्षात वैद्यकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हा खर्च महाग होत चालला आहे, त्यामुळे वैद्यकीय खर्चाचा मोठाच आर्थिक ताण सर्वसामान्य माणसावर येतो आहे.

आर्थिक नियोजन करत असताना बचत, गुंतवणूक आणि आयुर्विम्यासारख्या घटकांचा नेहमीच विचार केला जातो. मात्र आरोग्य विम्याकडे दुर्लक्ष केले जाते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आपण आर्थिक स्थैर्यासाठी, संपत्ती निर्मितीसाठी बचत करत असतो, गुंतवणूक करत असतो. मात्र जर एखादा मोठा खर्च अचानक उद्भवला तर आपली बहुतांश बचत आणि गुंतवणूक खर्ची पडण्याची शक्यता असते. असाच एक महत्त्वाचा खर्च आहे, वैद्यकीय खर्च. मागील काही वर्षात वैद्यकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हा खर्च महाग होत चालला आहे, त्यामुळे वैद्यकीय खर्चाचा मोठाच आर्थिक ताण सर्वसामान्य माणसावर येतो आहे. 

'मुडीज' ने २२ वर्षांत पहिल्यांदा घटवले भारताचे पतमानांकन

वैद्यकीय खर्चामुळे तातडीने होणार नुकसान टाळण्याचा सर्वात प्रभावी उपाय आरोग्य विमा हा आहे. आरोग्य विमा म्हटला की विमा संरक्षण आणि त्यासाठीचा खर्च, हफ्ता यासंदर्भात ग्राहक चिंताग्रस्त असतात. कारण बऱ्याचवेळा अधिक प्रिमियम वसूल करून फारसे पदरात काही न पडण्याचा अनुभव काही ग्राहकांना येतो. मात्र याचा अर्थ आरोग्य विमा ही संकल्पनाच चुकीची किंवा फसवी आहे असे अजिबात नाही. वैद्यकीय खर्च वाढत जाण्याच्या काळात आरोग्य विमा हा आर्युविम्याइतकाच आवश्यक झाला आहे. आरोग्यविम्यासंदर्भात लक्षात घ्यावयाचे काही मुद्दे,

शेअर बाजारातील तेजी कायम

१) कष्टाने बचत केलेला पैसा एखाद्या आजारपणात अचानक संपुष्टात येऊ शकतो. त्यासाठी आरोग्य विमा अत्यंत महत्त्वाच आहे.
२)दिवसेंदिवस वैद्यकीय सुविधा आणि खर्च महागच होत जाणार आहेत, त्यामुळे कधीतरी अचानक उद्भणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी आरोग्य विमा लाभदायी ठरतो.
३) आरोग्य विमा फक्त घरातील काम करणाऱ्या व्यक्तीसाठीच नाही  तर संपूर्ण कुटुंबासाठी महत्त्वाचा असतो.
४) बाजारात विविध कंपन्यांचे विविध आरोग्य विमा उपलब्ध आहेत, आपल्या गरजेनुरूप त्याची निवड करावी. कारण प्रत्येक कुटुंबाची गरज वेगवेगळी असू शकते.
५) आरोग्य विमा घेताना सर्व अटी, विम्याची व्याप्ती, मिळणारे विमा संरक्षण इत्यादी बाबी नीट समजून घ्या
६) विमा मग तो आयुर्विमा असो की आरोग्य विमा, तो घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच उपयुक्त असते.
७) आपण सध्या तंदुरुस्त आहोत, त्यामुळे आरोग्य विमा घेणे टाळले जाते. या ट्रॅपमध्ये अडकू नये. वैद्यकीय खर्च केव्हाही उद्भवू शकतो. त्यावेळेस मोठ्या प्रयत्नांनी केलेली बचत खर्च पडू शकते किंवा हाती पैसा नसल्यास मोठी धावाधाव करावी लागू शकते. आरोग्य विमा या सर्वांवर उत्तम उपाय आहे.
८)विमा कंपनी देऊ करत असलेली योजना तशीच घेण्याऐवजी आपल्या गरजा स्पष्टपणे मांडून आपल्या गरजेनुरूप आरोग्यविमा घ्यावा.
९) प्रत्येक पॉलिसीचा आधीपासून असलेल्या आजारासाठी प्रतीक्षा कालावधी वेगवेगळा असतो. पॉलिसी घेताना तो नेहमी लक्षात घ्यावा.
१०) जितक्या तरुण वयात आरोग्य विमा घ्याल तितका तो फायदेशीर ठरतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Insurance important aspect of financial planning