शेअर बाजारातील घसरणीचे वारे कायम

शेअर बाजारातील घसरणीचे वारे कायम

मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे सलग सहाव्या सत्रात बुधवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १३९ अंशांची घसरण होऊन ३८ हजार १८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३ अंशांची घट होऊन ११ हजार ४७६ अंशांवर बंद झाला. 

जागतिक पातळीवरील चिंताजनक स्थिती आणि रुपयातील घसरण यामुळे गुंतवणूकदार जोखीम स्वीकारण्यास तयार नाहीत. रुपयाने आज पुन्हा ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली होती. यातच सेवा क्षेत्राची वाढ ऑगस्टमध्ये मंदावल्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्‍स आज १३९ अंशांची घसरण होऊन ३८ हजार १८ अंशांवर बंद झाला. निर्देशांकाची ही दोन आठवड्यांतील नीचांकी पातळी आहे. सलग सहा सत्रांत निर्देशांकात ८७८ अंशांची घसरण झाली. मागील सहा महिन्यांत निर्देशांकात सलग सहा सत्रात घसरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, काल (ता.४) देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २१.४१ कोटी रुपयांचे समभाग विकले, तर परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ३२.६४ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. 

घसरले - एचयूएल, कोटक बॅंक, भारती एअरटेल, आरआयएल, एचडीएफसी, हिरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, एल अँड टी, इन्फोसिस, टीसीएस, ॲक्‍सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, ओएनजीसी, पॉवर ग्रीड आणि एम अँड एम आदी कंपन्यांच्या समभागात आज २.४५ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. 

वधारले - येस बॅंक, वेदांत, अदानी पोर्टस, विप्रो, सन फार्मा, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बॅंक, इंड्‌सइंड बॅंक, एशियन पेंट्‌स, मारुती सुझुकी, आयटीसी, टाटा स्टील, एनटीपीसी आणि एसबीआयच्या यांच्या समभागात आज २.९३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com