Share Market Crash : ऐकावं ते नवलंच, हिमालयातला बाबा चालवत होता स्टॉक मार्केट!

चित्रा रामकृष्ण यांच्यावरील वादात समोर आलं होतं की, त्यांना वेळोवेळी हिमालयातले बाबा इमेलने मार्गदर्शन करत होते.
Share Market Crash
Share Market Crashesakal
Updated on

Share Market Crash Chitra Ramkrishna : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांनी आपल्या पदाचा अशा प्रकारे दुरुपयोग केला की, त्याचा तपास बऱ्याच एजंसीजद्वारा करण्यात आला. पण सगळ्यात मोठा प्रश्न उठला तो त्या निनावी योगी विषयी ज्यांच्या इशाऱ्यावर चित्रा रामकृष्ण देशाचा सगळ्याक मोठे स्टॉक मार्केट चालवत होती. तो बाबा चित्रा यांना इमेल पाठवत आणि त्यानुसार त्या निर्णय घेत होत्या.

Share Market Crash
Share Market Crash : अदानींवर आरोप आणि शेअरधारकांना ताप, शेअर मार्केट विक्रमी अंकांनी कोसळले

याविषयी SEBI ने १९० पानांच्या आपल्या रिपोर्टमध्ये या बाबविषयीची फक्त उत्सुकता वाढवणारी कहाणी लिहिली आहे. तर दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड फॉरेंसिक रिपोर्ट तयार करणारी कंसल्टंट फर्म EY चं म्हणणं आहे की, आनंद सुब्रमण्यम हेच तो निनावी बाबा आहे. तर चित्रा रामकृष्ण आणि SEBI नुसार या कहाणीत तिसरा व्यक्ती जबाबदार आहे. त्या बाबाच्या सांगण्यावरूनच आनंद सुब्रमण्यमला मोठी जबाबदारी देण्यात आली होती.

Share Market Crash
Share Market Crash : शेअर बाजार कोविडमुळे कोसळला की, दुसरचं काही कारण? जाणून घ्या...

इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार अजून एका अँगलचा उल्लेख करण्यात आला आहे. NSE मध्ये कामकरणाऱ्या जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार जे चित्राला त्यांच्या सुरवातीच्या काळापासून ओळखतात. त्यांच्या म्हणण्यानुसार चेन्नईत एक बाबा राहतात ज्यांच्यावर चित्रा यांचा खूप विश्वास होता. त्यांना भेटायला सतत चेन्नईला जात असे. या बाबाचं नाव मुरुगडिमल सेंथिल स्वामिंगल होते. चित्रा त्यांना अध्यात्मिक गुरु मानायच्या. त्या लोकांच्या म्हणण्यानुसार आनंद सुब्रमण्यम पण त्या बाबाच्या फार जवळ होत्या. काही वर्षांपूर्वी या बाबांचं निधन झालेलं आहे.

Share Market Crash
Paytm Shares Crash : पेटीएमच्या शेअर्समध्ये विक्रमी घसरण; 1.07 लाख कोटींचे नुकसान, 'हे' आहे कारण

चैन्नई बाबाचा प्रसाद वाटायच्या

चेन्नईच्या या गुरुंना भेटायला चित्रा कायम जायच्या. तिकडून आल्यावर प्रसाद घेऊन यायच्या. ही शक्यता नाकारता येत नाही की, त्यांच्याच सांगण्यावरून काही लोकांना स्टॉक एक्सचेंजमध्ये नोकरी देण्यात आली आहे. आनंद सुब्रमण्यसुध्दा त्यापैकी एक असू शकतात. पण या विषयी कोणतेही पुरावे नाहीत.

या इमेल आयडी वरुन दिला जायचा सल्ला

SEBI च्या रिपोर्टनुसार एक तिसरी व्यक्ती वेळोवेळी चित्रा यांना इमेलद्वारा सल्ला द्यायचे. तो मेल आयडी rigyajursama@outlook.com असं होतं. या मेलवरुनच NSE वरिष्ठ ऑफिशियल्स, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, लॉबी सह विविध मुद्द्यांवर सल्ला दिला जात होता. ते योगी स्वतः हा इमेल करत होते की, त्यांचा पासवर्डपण कोणी हॅक केला होता याविषयी पण काही माहिती मिळू शकलेली नाही.

चित्रा रामकृष्ण कार्यकाळ

चित्रा एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ पर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या एमडी आणि साईओ होत्या. त्या योगींना सिरोमणी म्हणायच्या. चित्रा यांच्या म्हणण्यानुसार ते एक अध्यात्मिक शक्ती आहेत. मागील २० वर्षांपासून वैयक्तिक आणि व्यावसायिक विषयांवर मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ते बाबा हे एक अध्यात्मिक शक्ती होती जे आपल्या इच्छेनुसार कुठेही प्रकट होऊ शकत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com