शेअर बाजारात ‘कन्सोलिडेशन’

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई: कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांमुळे शेअर बाजारात 'कन्सोलिडेशन' झाले आहे. सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण झाली आहे. नफावसुलीचे प्रमाण वाढल्याने निफ्टीला 8800 अंशांची पातळी कायम राखण्यात अपयश आले आहे. सध्या(बुधवार, सकाळी 10 वाजता) 24.89 अंशांच्या घसरणीसह 28,314.42 पातळीवर व्यवहार करत आहेत. दरम्यान, निफ्टी 8,788.65 पातळीवर व्यवहार करत असून 3.65 अंशांनी घसरला आहे.

ऑटो क्षेत्रात एक टक्क्याहून अधिक घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे, हेल्थकेअर क्षेत्रातदेखील विक्रीचा मारा सुरु आहे. इतर क्षेत्रांमध्ये किरकोळ वाढीसह व्यवहार सुरु आहे.

निफ्टीवर अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट्स, हिंडाल्को, झी एन्टरटेनमेंट आणि बॉशचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर टाटा मोटर्स, टाटा मोटर्स(डीव्हीआर), सन फार्मा, आयडिया सेल्युलर आणि बीएचईएलचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.

Web Title: share market down