Share Market : लवकरच येतोय सरकारी कंपनीचा आणखी एक आयपीओ

आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल स्वरूपात असेल आणि त्यात कोणत्याही नवीन इश्यूचा समावेश नाही.
Share Market : लवकरच येतोय सरकारी कंपनीचा आणखी एक आयपीओ

share market : पुन्हा एकदा सरकारी कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी वॅपकॉस लिमिटेडने (Wapcos Ltd) आयपीओसाठी (IPO) सेबीकडे अर्ज केला आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार आयपीओअंतर्गत, कंपनीचे प्रवर्तक भारत सरकारद्वारे 32,500,000 इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर (OFS) देईल. आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल स्वरूपात असेल आणि त्यात कोणत्याही नवीन इश्यूचा समावेश नाही.

Share Market : लवकरच येतोय सरकारी कंपनीचा आणखी एक आयपीओ
Share Market: घसरणीला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 278 तर निफ्टीत 60 अंकाची तेजी

वॅपकॉस लिमिटेड (Wapcos Ltd) पाणी, वीज आणि पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांमध्ये काउंसिलिंग आणि इंजीनिअरिंग सेवा देते. ही कंपनी जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येते. कंपनी परदेशातही आपली सेवा पुरवते. विशेषतः दक्षिण आशिया आणि संपूर्ण आफ्रिकेत, वॅपकॉसने धरण आणि जलाशय इंजीनिअरिंग, सिंचन आणि पूर नियंत्रण क्षेत्रात काम केले आहे. त्यांचे 30 देशांमध्ये प्रकल्प सुरु आहेत आणि कंपनी 455 हून अधिक परदेशातील प्रकल्पांमध्ये गुंतलेली आहे.

Share Market : लवकरच येतोय सरकारी कंपनीचा आणखी एक आयपीओ
Share Market: शेअर बाजारात तेजीला मोठा ब्रेक; सेन्सेक्सची घसरगुंडी सुरूच

कंपनीचे उत्पन्न

2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीचे ऑपरेशनल इन्कम 11.35% ने वाढून 2,798 कोटी झाले आहे, तर PAT याच कालावधीत 14.47% ने वाढून 69.16 कोटी झाले आहे. आयडीबीआय कॅपिटल आणि एसएमसी कॅपिटल हे इश्यूचे प्रमुख व्यवस्थापक आहेत.

Share Market : लवकरच येतोय सरकारी कंपनीचा आणखी एक आयपीओ
Share Market : साऊथच्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल कंपनीचा आयपीओ लवकरच

मार्चपर्यंत, इंजीनिअरिंग कंन्सल्टंसी सर्व्हिसेजसाठी कंसोलिडेटेड ऑर्डर बुकची स्थिती 2,533.94 कोटी आणि कंस्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टसाठी 18,497.83 कोटी होती. कंपनीची एकूण थकबाकी 722.10 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 68.77 कोटी रुपये होता जो गेल्या वर्षी 60.15 कोटी रुपये होता.

Share Market : लवकरच येतोय सरकारी कंपनीचा आणखी एक आयपीओ
Share Market: शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com