Share Market : शेअर बाजार एक्स्पर्ट्सचा 2 स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला...

अशात आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक्सची लिस्ट आणली आहे.
Share Market
Share Market google

मुंबई : शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पण अशात तज्ज्ञांच्या मदतीने काही शेअर्सचा विचार केला तर नक्की फायदा होऊ शकतो.

अशात आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी तुमच्यासाठी मजबूत स्टॉक्सची लिस्ट आणली आहे. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या शेअर्सचा विचार करु शकता. हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

Share Market
Share Market Closing : आर्थिक सर्वेक्षणानंतर शेअर बाजारात तेजी; बँकांच्या 'या' शेअर्समध्ये तेजी

मार्केट पडलं असताना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची चांगली संधी असल्याचे तज्ज्ञ सांगत असतात. अशावेळी चांगले शेअर्स हेरुन त्यात गुंतवणूक करणे येत्या काळासाठी तुम्हाला फायदेशीर ठरु शकते असे त्यांचे म्हणणे आहे.

बाजारात अस्थिरता कायम असतेच, शिवाय अर्थसंकल्पाबाबत कोणतीही नेगिटीव्ह बातमी समोर आली नाही तर बाजारात तेजी येण्याची शक्यता भसीन यांनी वर्तवली आहे.

त्यामुळेच संजीव भसीन यांनी टाटा पॉवर आणि बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. कारण येत्या काळात हे दोन्ही शेअर्स आऊटपरफॉर्म करण्याचा विश्वास भसीन यांना आहे.

1) टाटा पॉवर (Tata Power)

सीएमपी (CMP) - 204.85 रुपये

टारगेट (Target) - 230 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 198 रुपये

Share Market
Share Market : आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

2) बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)

सीएमपी (CMP) - 160.40 रुपये

टारगेट (Target) - 180 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 155 रुपये

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com